तुळजापूर तालुक्यातील खंडाळा येथे भर दिवसा घरफोडी : सव्वा लाखाचा ऐवज लंपास नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण-Tuljapur Robbery Crime News Police Station

Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापूर तालुक्यातील खंडाळा येथे भर दिवसा घरफोडी : सव्वा लाखाचा ऐवज लंपास नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण-Tuljapur Robbery Crime News Police Station

तुळजापूर तालुक्यातील खंडाळा येथे भर दिवसा घरफोडी : सव्वा लाखाचा ऐवज लंपास नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण- 


धाराशिव /प्रतिनिधी रूपेश डोलारे : तुळजापूर तालुक्यातील खंडाळा येथे अज्ञात चोरट्याने एका घरामध्ये चोरट्याने 30 सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास घरफोडी करून सव्वा लाखाचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे याप्रकरणी तुळजापूर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरटेविरुद्ध  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की तुळजापूर तालुक्यातील खंडाळा येथील रहिवाशी नारायण सुधाकर पवार यांच्या घरी अज्ञात चोरट्यांनी 30 सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊ ते दुपारी दीड वाजेच्या सुमारास घरफोडी करून एक लाख 56 हजार 500 रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमध्ये अज्ञात चोरट्याने नारायण पवार यांच्या राहत्या घराचे पत्रे उचकटून आत प्रवेश केला त्यानंतर घरातील एका खोलीचा कडी कोंडा तोडून कपाटातील ४९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि रोख 40 हजार रुपये असा एकूण 1 लाख 56 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल  चोरट्याने चोरून नेला . घरी परतल्यानंतर चोरीचा हा प्रकार लक्षात येतात फिर्यादी नारायण पवार यांनी दिनांक 1 ऑक्टोबर रोजी तुळजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली या फिर्यादीवरून अज्ञात चोरटेविरुद्ध तुळजापूर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत भर दिवसा केलेल्या या धाडसी चोरीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे याप्रकरणी या घटनेतील चोरट्यांचा तपास करून मुसक्या आवळण्यात याव्या अशी मागणी ग्रामस्थातून होत आहे.

Post a Comment

0 Comments