घरकुलासाठी ठरावात नाव घेण्यासाठी दहा हजार रुपयाची लाच घेताना महिला सरपंच एसीबीच्या जाळ्यात; लातूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई-
लातूर/प्रतिनीधी रूपेश डोलारे : रमाई आवास योजनेच्या घरकुलासाठी ग्रामपंचायतच्या ठरावात नाव घेण्यासाठी दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून ती स्वीकारण्यास नकार देणाऱ्या चाकूर तालुक्यातील अंबुलगा येथील महिला सरपंचावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेबाबत एसीबीकडुन (ACB) मिळालेले अधिक माहिती अशी की अंबुलगा ग्रामपंचायतीने रमाई आवास योजनेसाठी लाभार्थ्यांची यादी करून पात्र लाभार्थ्यांचा ठराव पंचायत समितीकडे पाठवला होता त्यात नाव न आल्याने त्याचा समावेश करण्यासाठी अंबुलगाच्या महिला सरपंच विद्या तेलंगे यांनी फिर्यादीकडे(complaint) १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली सदर रक्कम त्यांच्या मुलाकडे देण्यास सांगितले यामुळे फिर्यादीने लातूर प्रतिबंधक विभागाला कळवले त्यांनी लाच मागितल्याची खात्री केली त्यानुसार दिनांक 18 व 24 सप्टेंबर रोजी फिर्यादीने सरपंचाच्या मुलाला लाच देण्याचा प्रयत्न केला परंतु आरोपीने लाच घेण्यास नकार दिला लाच मागितल्याचे सिद्ध झाल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आरोपी विद्या तेलंगे यांच्याविरुद्ध चाकूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 523/ 25 कलम 7 भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या सापळा कारवाईत यशस्वी करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाध्यक्ष संतोष बर्गे निरीक्षक जगदीश राऊत, विशाल अहात्तरे तर हेड कॉन्स्टेबल , फारूक दामटे , भागवत कठारे ,भीमराव आलुरे, श्याम गिरी ,मंगेश कोंढरे दीपक कलवले गजानन जाधव , किरण गंभीरे, शहाजान पठाण ,असलम सय्यद शिवराज गायकवाड ,परवीन तांबोळी ,संतोष क्षीरसागर यांचा समावेश होता. या कारवाईवरून भ्रष्टाचाराची कीड ग्राम प्रशासनामध्ये किती खोलवर रुजली आहे यावरून स्पष्ट होते या कारवाईमुळे ग्राम प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे.

0 Comments