18 वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील घटना-Suicide News Soith Solapur
सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील निम्बर्गी येथे अज्ञात कारणावरून अठरा वर्षाच्या तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवार दिनांक 18 रोजी चार वाजण्याच्या सुमारास घडली अक्षता बाळासाहेब काटकर वय (18) राहणार निम्बर्गी तालुका दक्षिण सोलापूर अशी आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे या प्रकरणी मंद्रूप पोलीस ठाण्यात याची नोंद झाली आहे.
या घटनेबाबत अधिक माहिती अशी की मयत अक्षता काटकर हिच्या वडीलाचे मूळ गाव सलगर बुद्रुक तालुका मंगळवेढा हे आहे मात्र ती निंबर्गी येथे आपल्या आजोळी राहत होती आजोबा तुकाराम डोंगरे व अजित सुशाबाई व मावशी मीनाक्षी इंगळे यांच्याकडे ती राहत होती कारण तीन वर्षांपूर्वी तिची आई वैशालीचे निधन झाले होते. बारावी उत्तीर्ण झालेली अक्षता सध्या शिवण क्लासेस चे प्रशिक्षण घेत होती दुपारी ती निम्बर्गी गावातील घरीच होती बाहेर आजोबा घरासमोर झोपले होते घरात एकटी असल्याने तिने दरवाजा पुढे करून आत मध्ये गळफास घेतला. बरेच उशीर झाला तरी मुलगी बाहेर का येत नाही म्हणून नातेवाईकानी आत मधी जाऊन पाहिली तेव्हा ती गळफास घेऊन असलेली अवस्थेत आढळून आली त्यानंतर मंद्रूप पोलीस ठाण्यात याची माहिती देण्यात आली . घटनेनंतर तात्काळ पोलीस उपनिरीक्षक राजकुमार डांगे यांनी घटनास्थळी पाहणी केली त्यानंतर मृतदेह मंद्रूपच्या ग्रामीण रुग्णालयात शविच्छेदनासाठी आणण्यात आला या प्रकरणी मंद्रूप पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

0 Comments