अपघाताचा बनाव करत एका ४२ वर्षीय तरुणाचा खुन; दोन आरोपी दोन भावडांना 24 तासाच्या आत अटक अनैतिक संबंधाच्या वादातून खून स्थानिकातून चर्चा , तुळजापूर तालुक्यातील घटना-Tuljapur-Wadgaov-Lakha Murder Crime News

Hot Posts

6/recent/ticker-posts

अपघाताचा बनाव करत एका ४२ वर्षीय तरुणाचा खुन; दोन आरोपी दोन भावडांना 24 तासाच्या आत अटक अनैतिक संबंधाच्या वादातून खून स्थानिकातून चर्चा , तुळजापूर तालुक्यातील घटना-Tuljapur-Wadgaov-Lakha Murder Crime News

अपघाताचा बनाव करत एका ४२ वर्षीय तरुणाचा खुन;  आरोपी दोन भावडांना 24 तासाच्या आत गजाआड अनैतिक संबंधाच्या वादातून  खून स्थानिकातून चर्चा , तुळजापूर तालुक्यातील घटना- 


तुळजापुर/बिभिषन मिटकरी : तुळजापूर तालुक्यातील वडगाव लाख येथे अनैतिक संबंधाच्या वादातून एका 42 वर्षीय युवकाचा खून (MurderCrime)झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी दिनांक 14 रोजी दुपारी घडली. महिलेच्या पतीसह दिराने दुचाकी अपघाताचा बनाव करून त्यांच्यावर जबरी हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की तुळजापूर तालुक्यातील वडगाव लाख (wadgaovlakha)येथील मेहबूब दगडूशेठ वय (42) हे एका विवाहित महिलेसोबत प्रेम संबंध होते.शुक्रवारी दुपारी दिनांक 14 रोजी वडगाव लाख गावाजवळील छोट्या ओढ्याच्या फुलावर महिलेच्या पती खंडु उंबर लोहार व दीर उध्दव उंबर लोहार (दोघे रा.वडगाव लाख) या दोघा भांवडाने मेहबूबच्या दुचाकीला समोरासमोर धडक दिली. या यामध्ये अपघाताचा बनाव करत दोघांनी त्याच्यावर तुटून पडत बेदम मारहाण केली. मारहाण एवढी भयानक होती की महबूब रक्तबंबाळ अवस्थेत थेट ओढ्यात कोसळला.या घटनेनंतर आरोपी लोहार बंधू यांनी स्वतःच पोलिसांना फोन करून अपघात झाला असल्याची दिशाभूल करणारी माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार घटनास्थळी दाखल झालेले पोलीस कर्मचारी बीट अंमलदार श्री विक्रम सावंत व हेडकाॅनीस्टेबल  वैभव देशमुख यांनी गंभीर अवस्थेत जखमी महबूबला तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले तेथून धाराशिव आणि नंतर प्रकृती चिंताजनक असल्याने सोलापुर येथे हलवण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना अश्विनी सहकारी रुग्णालयामध्ये मध्यरात्री त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान या घटनेची माहिती मिळताच तुळजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे सहाय्यक पोलीस निरीक्षक मध्ये रेड्डी पोलीस उपनिरीक्षक विजय थोटे पोलीस हेडकॉन्स्टेबल संतोष करवार विक्रम सावंत, वैभव देशमुख ,सपकाळ ,गिरी यांना घटनास्थळी धाव घेत घटनेची माहिती घेतली. सोलापूर येथे जाऊन मताचा पंचनामा ही केला आहे सोलापूर येथे शव विच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांना देण्यात आला. घटनेनंतर रात्री उशिरापर्यंत आरोपी दोन भावंडाविरुद्ध तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने धाव घेत मोठ्या शिताफतीने बारा तासाच्या आत हा अपघात नसून खून असल्याचा उलवडा करून दोन आरोपीच्या मुस्क्या आवळण्यात आल्या आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास तुळजापूर पोलीस करत आहेत.या घटनेमुळे वडगाव लाख परिसरात एकत्र खळबळ आहे.

या अगोदरही बलात्काराची तक्रार दिली होती महिलेने

तुळजापूर तालुक्यातील वडगाव लाख येथे घडलेल्या खून खून प्रकरणात आणखी एक गंभीर पार्श्वभूमी आहे मयत महबूब दगडूशेठ याच्याविरुद्ध संबंधित महिलेने तुळजापूर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा नोंदवला होता या तक्रारीवरून गावात मोठी चर्चा सुरू होती तसेच महिलेच्या पतीला मारहाण झाल्याची नोंद ही यापूर्वी तुळजापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती.

मयत महबूब शेख यांनी चार दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर महिलेसोबतचा व्हिडिओ पोस्ट केला 

या खून प्रकरणाला अजून एक वेगळे वळण मिळाले आहे काही दिवसापूर्वी सदर महिला आणि महबूब गावातून पळून गेल्याची चर्चा गावात रंगली होती ही चर्चा शांती होत नव्हती तोवर चार दिवसांपूर्वी महबूबने सोशल मीडियावर महिलेसोबतचा व्हिडिओ पोस्ट केला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर महिलेचा पती आणि दिराचा राग अनावर झाल्याची चर्चा आहे.

Post a Comment

0 Comments