कारच्या धडकेत दुचाकीस्वार दोन तरुणाच्या जागेचा मृत्यू लातूर जिल्ह्यातील घटना कारचालकाचे घटनास्थळावरून पलायन -
लातूर : अहमदपूर तालुक्यातील हडोळती टोलनाक्यापासून उद्या एक किलोमीटर अंतरावर गुरुवारी दिनांक 13 रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास कार दुचाकीचा समोरासमोर भीषण अपघात झाला या अपघातामध्ये दोन तरुणांचा जागेत मृत्यू झाला .या अपघातातील मृतांची नावे माधव गुलाब लोहगावे वय 25 (राहणार कोकळेगाव तालुका. नायगाव जिल्हा. नांदेड) व संतोष संभाजी चिंतले वय 20 (राहणार चारवाडी तालुका नायगाव जिल्हा नांदेड़) अशी आहे.
या घटनेबाबत पोलिसांनी मिळालेले अधिक माहिती अशी की अपघातातील मयत माधव गुलाब लोहगावे वय 25 राहणार कोकळगाव तालुका नायगाव जिल्हा नांदेड व संतोष संभाजी चिंतले वय 20 राहणार चारवाडी तालुका नायगाव जिल्हा नांदेड हे दोघे पुण्यात नोकरीला होते. दिवाळी सणानिमित्त हे दोघेही गावाकडे आली होते नायगावहून कोकळगाव कडे दुचाकी (एम एच 26 सी एन 98 25 )वरून परत असताना जगळपुर कॉर्नर परिसरात नायगावहुन लातूरकडे जात असताना कार क्रमांक (एम एच 26 1193 )या कारची धडक बसली.
हा अपघात एवढा भीषण होता की दुचाकी स्वरांना 100 ते 150 फुटापर्यंत फरपटत नेण्यात आले रस्त्यालगत असलेल्या ओढ्याच्यामृतां(चीला कार आदळून थांबली. अपघातानंतर कारचालकाने वाहन जागीच सोडून घटनास्थळावरून पलायन केल्याची स्थानिकांनी सांगितले. घटनास्थळी पोलीस व रुग्णवाहिका उशिरा पोहोचल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. दोन्ही मृतदेह रात्रीच प्राथमिक आरोग्य केंद्र हडोळती येथे हलवण्यात आली.दिनांक 14 नोव्हेंबर रोजी शविच्छेदन करून मृत्य नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आली .पोलीस आल्यानंतर पंचनामा करून मृतदेह रात्री हडोळती प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. शुक्रवारी सकाळी शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. दुपारच्या सुमारास मृत दोन्ही तरुणांवर गावातील स्मशानभूमीत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.या अपघाताच्या घटनेची अहमदपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार करत आहेत या दुर्दैवी घटनामुळे हडोळती परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

0 Comments