हद्यद्रावक घटना : बार्शी शहरांमध्ये १४ महिन्याच्या मुलाल विष पाजून आईची गळफास घेऊन आत्महत्या, चिमूरड्यावर उपचार सुरू-Barshi Suicide Crime News

Hot Posts

6/recent/ticker-posts

हद्यद्रावक घटना : बार्शी शहरांमध्ये १४ महिन्याच्या मुलाल विष पाजून आईची गळफास घेऊन आत्महत्या, चिमूरड्यावर उपचार सुरू-Barshi Suicide Crime News

हद्यद्रावक घटना : बार्शी शहरांमध्ये १४ महिन्याच्या मुलाल विष पाजून आईची गळफास घेऊन आत्महत्या, चिमूरड्यावर उपचार सुरू-


सोलापूर/प्रतिनिधी रूपेश डोलारे  : बार्शी शहरातील वाणी प्लॉट परिसरात एक रदे द्रावक घटना उघडकीस आली आहे. एका महिलेने स्वतःच्या 14 महिन्याच्या मुलाला विष पाजून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या(Suicide)  केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अंकिता वैभव उकिरडे वय (25) हिने राहत्या घरात आपल्या 14 महिन्याचा मुलगा  अन्वीकला विषारी द्रव्य पासून स्वतः साडीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवार दिनांक 7 रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. या घटनेत आईचा जागीच मृत्यू झाला असून चिमुकला अन्वीक वैभव उकिरडे वय 14 महिने यांच्यावर बार्शी येथील जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले असून पुढील उपचारासाठी त्याला सोलापूर येथे हलवण्यात आली आहे. मृत अंकिता हिचे लग्न (Marraige)वैभव विकास उकिरडे यांच्याशी चार वर्षांपूर्वी झाली होते या घटनेच्या वेळी घरातील सर्व सदस्य कामानिमित्त बाहेर गेले होते अंकिता ही घरात चिमुकल्या मुलासह एकटीच होती दरम्यान नेहमीप्रमाणे घर कामासाठी आलेल्या सुनंदा नावाच्या महिलेला घरात कोणी दिसले नाही त्यांनी खिडकीतून डोकावुन  पाहिले असता अंकिता साडीच्या साह्याने सिलिंग फॅनला (Ciling Fan)गळफास घेतल्याची दिसून आली; तर लहान मुलगा आणि वीक अत्यावस्थ अवस्थेत आढळला त्यानंतर त्यांनी शेजारी राहणारे नातेवाईक प्रतीक सतीश उकिरडे यांना घटनेची माहिती दिली. प्रतीक यांनी घटनास्थळी धाव  घेतल्यानंतर घटनेची खात्री पटली आणि त्यांनी तात्काळ बार्शी शहर पोलीस ठाण्यात(Barshi City Police Station)  याची खबर दिली.

पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आहे आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून या घटनेचा अधिक तपास बार्शी पोलिस(Barshi Police Station)  करत आहेत. या हद्यद्रावक  घटनेमुळे शहर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Post a Comment

0 Comments