नातेपुते ते बारामतीला जाणाऱ्या दहिगाव कुरबावी रस्त्याची दुरुस्ती व रुंदीकरण करण्याची बाबुराव खिलारे यांची बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे मागणी

Hot Posts

6/recent/ticker-posts

नातेपुते प्रतिनिधी :  नातेपुते ते बारामतीला जाणाऱ्या दहिगाव कुरबावी रस्त्याची अवस्था रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी खड्डेमय  झाली असून नागरिकांना जीव मुठीत घेऊन सदर रस्त्याने रोज प्रवास करावा लागत आहे या रस्त्यावरून नातेपुतेसह परिसरातील गावातून व सातारा जिल्ह्यातील म्हसवड, दहिवडी, गोंदवले, शिखर शिंगणापूर या परिसरातून मोठ्या प्रमाणात बारामती ला ये जा करणाऱ्या प्रवाशांची मोठ्या प्रमाणात  वर्दळ  असून सुद्धा या रस्त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असल्याने रस्त्याची खूपच  दुरवस्था  झाली असून खराब व अरुंद रस्त्यामुळे 

 जनतेला खूपच त्रास होत असल्याने या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या रस्त्याची लवकरात लवकर रुंदी करन होऊन दुरुस्ती मंजुरी द्यावी अशी मागणी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना माळशिरस तालुका भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष अनुसूचित जाती मोर्चा बाबुराव खिलारे व सामाजिक कार्यकर्ते सचिन खिलारे यांनी दि.७ नोव्हेंबर रोजी  निवेदन दिले  बांधकाम मंत्री शिवेंद्रसिह राजे भोसले यांना निवेदन देताना

 माळशिरस तालुक्याचे माजी आमदार राम सातपुते, बाबुराव खिलारे, सचिन खिलारे आधी पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments