बीड : कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा दलाल जेरबंद ,धाराशिवच्या पिडीत महिलेची सुटका
बीड/प्रतिनिधी/रुपेश डोलारे : केज शहरालगत असलेल्या एका घरात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर धाड टाकून स्वतःच्या घरात वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या इसमाला ताब्यात घेत पीडीतिची सुटका केली आहे .पोलिसांनी पाठवलेल्या डमी ग्राहक थुंकण्याचा बहाना करून बाहेर आला आणि पोलिसांना इशारा केला यानंतर पोलिसांनी धाड टाकली . केज येथील भवानी माळ येथे मारुती भिवाजी साठे राहणार (तांबवा ता. केज )हा त्यांचे राहत्या घरी वेश्या व्यवसाय चालवीत होता ही माहिती गुप्त खबर्यामार्फत पोलिसांना मिळाली केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक स्वप्निल उनवणे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत काॅवत यांनी माहिती दिली जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशावरून अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव यांच्या पथकाला कारवाईचे आदेश दिले .
पोलीस निरीक्षक स्वप्निल उनवणे यांनी एक डमी ग्राहक व पोलीस पथकास योग्य त्या सूचना देऊन स्वतः पोलीस निरीक्षक स्वप्नील बनवणे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या महिला पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव पोलीस हेड कॉन्स्टेबल बाळासाहेब अहंकारी ,महिला पोलीस हवालदार दगडखैर ,पोलीस हवालदार प्रदीप येवले , पोलीस हवालदार अशोक शिंदे ,आणि योगेश निर्धार हे पंचासह दिनांक 29 ऑक्टोबर रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास भवानीनगर धारूर रोड केज रोड केज येथे थांबून सापळा रचला डमी ग्राहका समोर मारुती भिवाजी साठे यांच्या घरात प्रवेश केला.
काही वेळाने डमी ग्राहकाने थुंकण्याच्या बहाण्याने बाहेर येऊन इशारा केला इशारा पाहून पोलिसांनी छापा मारला आणि कुंटनखाना चालविणारा मारुती साठे याला ताब्यात घेत धाराशिव जिल्ह्यातील हल्ली मुक्काम युसुफ वडगाव तालुका केज येथील एका 37 वर्षीय महिलेची सुटका केली .
जळतीत डमी ग्राहकाकडे पोलिसांनी दिलेला नोटा आणि वेश्या व्यवसायासाठी वापरण्यात येणारे कंडोम अशा मुद्देमाल जप्त केला पोलीस उपनिरीक्षक उमेश निकम यांचे फिर्यादीवरून मारुती साठे याच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 599 / 2025 भारतीय न्याय संहिता कलम 143 2 आणि अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायदा पिटा 1956 चे कलम 3,4,5,6 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक स्वप्निल उगवणे हे करीत आहेत.

0 Comments