शहापूर जि.प. गटातून सातलिंग स्वामी रिंगणात आले तर…. नक्कीच होणार कायापालट!

Hot Posts

6/recent/ticker-posts

शहापूर जि.प. गटातून सातलिंग स्वामी रिंगणात आले तर…. नक्कीच होणार कायापालट!

शहापूर जि.प. गटातून सातलिंग स्वामी रिंगणात आले तर…. नक्कीच होणार कायापालट!


"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""

शहापूर गटातील मतदाराच्या आग्रहास्तवच निवडणूक रिंगणात उतरणार...... सातलींग स्वामी.

""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""

इटकळ (दिनेश सलगरे):- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजलाय. विविध राजकीय पक्षांचे पुढारी गुडघ्याला बाशिंग बांधून मैदानात उतरण्यास सज्ज झाले आहेत. कोणी दादा, कोणी काका, कोणी भैया तर कोणी अप्पा म्हणून ओळखले जाता पण इथे एका नावाची चर्चा वेगळीच आहे ती म्हणजे माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांचे माजी विशेष सहाय्यक सातलिंग स्वामी नगरपालिका असो, जिल्हा परिषद असो वा पंचायत समिती प्रत्येक ठिकाणी जनता आपला प्रतिनिधी सेवकाच्या भूमिकेत पाहू इच्छिते,सातलिंग स्वामी हे मंत्रालयातील दीर्घ अनुभवामुळे जनतेच्या समस्यांचे सखोल ज्ञान असलेले व्यक्तिमत्त्व आहे. आपल्या भागातील प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आवश्यक निधी, योजना आणि प्रशासकीय निर्णय मंत्रालयापर्यंत नेऊन आणण्याची त्यांची क्षमता ग्रामस्थांमध्ये विश्वास निर्माण करते.शहापूर जि.प. गटातून सातलिंग स्वामी निवडणूक लढवतील, अशी अपेक्षा नागरिकांमध्ये जोर धरत आहे.या गटात शहापूर (गण क्र. 81) आणि येवती (गण क्र. 82) या पंचायत गणांचा समावेश असून एकूण 21,513 मतदार आहेत — त्यात पुरुष मतदार 11,351, महिला 10,161 आणि इतर 1 मतदार आहेत.शहापूर मतदारसंघात लिंगायत समाजाचा प्रभाव लक्षणीय असून सराटी, फुलवाडी, केशेगाव,इटकळ, देवसींगा नळ,हिप्परगा (ताड) , निलेगाव या गावांमध्ये शिवा संघटनेच्या शाखा सक्रिय आहेत. याशिवाय लिंगायत, मुस्लिम आणि इतर समाजातील मतदार सातलिंग स्वामी यांना निवडणुकीत उतरावे अशी मागणी करत आहेत.मंत्रालयीन अनुभव, लोकसंपर्क आणि शहापूरच्या विकासाचा ध्यास ,जर सातलिंग स्वामी रिंगणात उतरले, तर शहापुर जिल्हा परिषद गटात राजकारण नव्हे, परिवर्तन पाहायला मिळेल असा नागरिकांचा विश्वास आहे.

Post a Comment

0 Comments