दुहेरी हत्याकांड : शेतात आखाड्यावर झोपलेल्या बाप -लेकाचा धारदार शस्त्राने वार करून निर्घुण खून, लातूर जिल्ह्यातील घटना-
लातूर/ प्रतिनिधी रुपेश डोलारे : अहमदपूर गावाजवळील शेतात झोपण्यासाठी गेलेल्या 70 वर्षीय वडिलांसह त्यांच्या वीस वर्षीय मुलाचा धारदार शस्त्राने निर्घुण खून केल्याची धक्कादाय घटना तालुक्यातील वृद्धाश्ररात सोमवारी दिनांक तीन रोजी मध्ये चर्चा सुमारास घडली आहे आरोपींनी पिता-पुत्रांची खून करून त्यांचे मृतदेह ओढत गावात पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीजवळ नेऊन फेकले त्यांच्यावर लुना मोटरसायकल टाकण्यात आली कोणाशीही वैर नसलेल्या या पिता -पुत्रांचा झोपेतच निर्घुण खून केल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. खुनाचा शोध लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.
शिवराज निवृत्ती सुरनर वय (70) आणि त्यांचा मुलगा विश्वनाथ शिवराज सुरनर वय (20) यांचा अज्ञाताच्या मारहाणीत खून झाला आहे. शिवराज सुरनर व त्यांचा मुलगा विश्वनाथ सुरनर हे दोघे नेहमीप्रमाणे सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास रूध्दा गावातील घरातून शेतातील आखाड्यावर झोपायला गेले होते.मध्यरात्रीच्या सुमारास करण्यात त्यांच्यावर धारदार शस्त्राने अज्ञाताने हल्ला केला हल्ला अतिशय क्रूरपणे करुन दोघांच्याही चेहरा आणि गळ्यावर धारदार शस्त्राने अनेक वार करून त्यांना ठार मारले. तपासाला गती देण्यासाठी घटनास्थळी फॉरेनची लॅबची टीम ,डॉग स्क्वाड, फिंगरप्रिंट एक्सपर्ट आणि मोबाईल एक्सपर्ट फॅन यांचा पाचारण करण्यात आले होते. त्यांनी पुरावेची संकलन करून तपास सुरू केला आहे. मृतदेहाचे शविच्छेदन करण्यात आले आहे ते नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आली आहेत याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती या घटनेचा अधिक तपास पोलीस कसून करत आहेत.
या दुहेरी हत्या खंडाचे गांभीर्य लक्षात घेऊन लातूर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली पोलीस अधीक्षक अमोल तांबे ,पोलीस उपाधीक्षक मंगेश चव्हाण ,अहमदपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोले ,पोलीस निरीक्षक विनोद म्हैञीवार यांच्या सह सहाय्यक पोलीस निरीक्षक केदासे, माणिक डोके आणि उपनिरीक्षक बुरकुले ,स्मिता जाधव आनंद मंगल डीबी पथक प्रमुख तानाजी आरदवाड यांच्यासह मोठा फौज फाटा गावात तळ ठोकून आहे.
अपघाताचा बनाव
बाप लेकाचा खुन केल्यानंतर अज्ञात आरोपींनी त्यांचे मृतदेह शेतातुन उचलले ते गावात जवळील पाण्याच्या टाकीजवळ फरफटत आणून फेकून दिले त्यानंतर अपघात झाल्याचे भासवण्यासाठी त्यांच्या अंगावर लुना मोटरसायकल टाकण्यात आली ही घटना मंगळवार दिनांक 4 रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली त्यानंतर संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
वर्षभरापूर्वीच्या घटनेची पुनरावृत्ती
रूद्धा गावच्या शिवारातील आखाड्यावर मागील वर्षभरापूर्वी दोन वृद्ध दांपत्यावर हल्ला करण्यात आला होता त्यात एका वृद्धाचा निग्रण खून झाला होता. अशीच गंभीर गुन्ह्याची पुनरावृत्ती होत असल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी नागरिकातून होत आहे.

0 Comments