शेतकऱ्याचा १४ एकर ऊसाचे अज्ञात व्यक्तीने जाळुन केले नुकसान;अज्ञाताविरूध्द गुन्हा नोंद धाराशिव जिल्हातील घटना-Dharashiv Paranda Police Station

Hot Posts

6/recent/ticker-posts

शेतकऱ्याचा १४ एकर ऊसाचे अज्ञात व्यक्तीने जाळुन केले नुकसान;अज्ञाताविरूध्द गुन्हा नोंद धाराशिव जिल्हातील घटना-Dharashiv Paranda Police Station

शेतकऱ्याचा १४ एकर ऊसाचे अज्ञात व्यक्तीने जाळुन केले नुकसान;अज्ञाताविरूध्द गुन्हा नोंद धाराशिव जिल्हातील घटना- 


धाराशिव/प्रतिनिधी रूपेश डोलारे : परंडा तालुक्यातील रोसा शिवारातील अभिजीत पोपटराव पाटील या शेतकऱ्याचे 14 एकर क्षेत्रावरील ऊस पिकांचे अज्ञात व्यक्तीने जाळून नुकसान केल्याची घटना घडली आहे याप्रकरणी शेतकरी श्री पाटील यांनी दिलेले प्रथम खबरे वरून परंडा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

फिर्यादी नामे- अभिजीत पोपटराव पाटील, वय 43 वर्षे, रा. रोसा ता. परंडा जि. धाराशिव यांचे  रोसा शिवारातील शेत सर्वे नं 74 (1)  मधील  फिर्यादी व आजुबाजूचे असणारे लोकांचे 14 एकर उसाचे क्षेत्र अज्ञात व्यक्तीने जाळुन  अंदाजे चार लाख रुपयाचे नुकसान केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- अभिजीत पाटील यांनी दि.19.11.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पो ठाणे परंडा येथे भा.न्या.सं.कलम 326(एफ)  अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास परंडा पोलीस करत आहेत या नुकसान मुळे शेतकरी अभिजीत पाटील हा आर्थिक संकटात सापडला आहे.

Post a Comment

0 Comments