राष्ट्रीय इंटक काँग्रेस धाराशिव जिल्हाध्यक्ष पदाचा श्री मधुकर शेळके यांचा राजीनामा ;महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांच्याकडे राजीनामा सुपूर्द -
तुळजापूर : राष्ट्रीय इंटक काँग्रेस धाराशिव जिल्हा अध्यक्ष पदाचा अध्यक्ष श्री मधुकर बबनराव शेळके यांनी आज दिनांक 21 रोजी राष्ट्रीय काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ. कैलास भाऊ कदम यांच्याकडे हा राजीनामा निवेदनाद्वारे सुपूर्द केला.
या निवेदनात श्री शेळके यांनी असे नमूद केले आहे की,धाराशिव जिल्हा इंटक काँग्रेस पदाचा राजीनामा आपल्याकडे सादर करत आहे; माझ्यासह 35 कार्यकर्त्यांचा राजीनामा पाठवत आहे आपण माझ्यावर विश्वास ठेवून
मला राष्ट्रीय इ टक काँग्रेस धाराशिव जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी गेल्यावर्षी दिल्यापासून मी अनेक कर्मचारी बांधकाम कर्मचारी व इतर संबंधित मजुराबाबत सतत त्यांना न्याय देण्यासाठी काम करत होतो पण मला माझ्या वैयक्तिक कामामुळे मला या पदापासून मुक्त करावी ही नम्र विनंती असे निवेदनात नमूद केले आहे.

0 Comments