पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या ;आत्महत्या प्रवर्त केल्याप्रकरणी पत्नीसह अन्य एका विरुद्ध गुन्हा दाखल तुळजापूर तालुक्यातील घटना-Husbands Suicide News Tamalwadi Police Station

Hot Posts

6/recent/ticker-posts

पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या ;आत्महत्या प्रवर्त केल्याप्रकरणी पत्नीसह अन्य एका विरुद्ध गुन्हा दाखल तुळजापूर तालुक्यातील घटना-Husbands Suicide News Tamalwadi Police Station

पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या ;आत्महत्या प्रवर्त केल्याप्रकरणी पत्नीसह अन्य एका विरुद्ध गुन्हा दाखल तुळजापूर तालुक्यातील घटना- 


धाराशिव/ प्रतिनिधी रुपेश डोलारे : सून परपुरुषाशी व्हाट्सअपवर व्हिडिओ कॉल द्वारे बोलून मुलाशी भांडण तक्रारी करत असल्याने तसेच सून व अन्य एक जण सतत त्रास देत असल्याने मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची तक्रार वडिलांनी तामलवाडी पोलीस ठाण्यात दिली आहे त्यानुसार सुनेसह अन्य एका विरुद्ध आत्महत्येस प्रवर्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की गहीनाथ दिगंबर पोफळे वय (28) वर्ष( रा. गावडी दारफळ ता. उत्तर सोलापूर )यांनी दिनांक 31 ऑक्टोंबर रोजी सायंकाळी साडेसात ते रात्री नऊ वाजेच्या दरम्यान तुळजापूर तालुक्यातील केमवाडी शिवारात पत्र्याच्या शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती या प्रकरणात मुलगा गहिनाथ याची पत्नी श्वेता गहीनाथ पोफळे (रा. गवळी दारफळ हल्ली मुक्काम टोकर वस्ती बाळे सोलापूर )ही सतत पर पुरुषाशी व्हाट्सअप वर व्हिडिओ कॉल वर बोलून पतीबरोबर भांडण तक्रारी करत होती पत्नी श्वेता व अजय पवार (रा. गुळवंची तालुका उत्तर -सोलापूर) या दोघांच्या त्रासाला कंटाळून गहिनाथ पोफळे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची तक्रार वडील दिगंबर पोकळे यांनी दिली त्यानुसार वरील रोगाव विरुद्ध तामलवाडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता बीएनएस कलम 109 3(5) अन्वे गुन्हा नोंद करण्यात आला आहे या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments