धाराशिवच्या अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीची अहमदपूरातुन सुटका-Latur-Ahamadpur Police Kidnap Minor Girls Crime News

Hot Posts

6/recent/ticker-posts

धाराशिवच्या अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीची अहमदपूरातुन सुटका-Latur-Ahamadpur Police Kidnap Minor Girls Crime News

धाराशिवच्या अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीची अहमदपूरातुन सुटका-


लातूर /प्रतिनिधी रूपेश डोलारे : अहमदपूर येथील ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार आणि त्याच्या पथकाने नियमित गस्तीमुळे धाराशिव येथून अपहरण झालेल्या एका अल्पवयीन मुलीची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.अपहरण करणारा आरोपी ही पोलिसाच्या जाळ्यात अडकला आहे पुढील कारवाईसाठी त्याला धाराशिव पोलिसांच्या ताब्यात(Dharashiv Police)  देण्यात आली आहे.

या घटनेबाबत पोलिसाकडून मिळालेली अधिक माहिती अशी की आनंद नगर पोलीस ठाण्यात दि, ११ रोजी फिर्यादी ज्योती सुनील अंकुशराव यांच्या तक्रारीवरून अपहरणाचा गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात एका 14 वर्षे दहा दिवस वयाच्या अल्पवयीन मुलीची आरोपी ओंकार गजेंद्र गेजगे यांनी अपहरण केली होते. आनंद नगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आर.एस. घाडगे यांनी अहमदपूर(Ahamadpur Police Station)  हवाली केले. पोलिसाची संपर्क केला अपहरण अल्पवयीन मुलगी आणि आरोपी ओंकार या दोघांनाही तपास कामी ताब्यात देण्याची कामे मागणी केली. पोलीस निरीक्षक विनोद मैत्रीवार यांनी अल्पवयीन मुलगी व आरोपीला धाराशिव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

गस्तीच्या वेळेस संशय बळावल्याने सापडला आरोपी

बुधवारी दिनांक 12 रोजी पहाटे तीन वाजेच्या  सुमारास अहमदपूरचे पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार   हे त्यांचे सहकारी पोलीस हेडकॉन्स्टेबल बमन सपडे ,विशाल मुंडे यांच्यासह रात्रीच्या गस्तीवर होते त्यावेळी त्यांना अहमदपूर तालुक्यातील तेलगाव वाडी शिवारात मोकळ्या जागेत संशयास्पद स्थितीत दोन व्यक्ती झोपलेली दिसले त्वरित विनोद मैत्रीवार यांनी त्याच्याकडे जाऊन चौकशी केली त्यांनी धाराशिव येथील पत्ता सांगितला मैत्रेवार यांच्या धाराशिव  आनंदनगर पोलीस ठाणे(Aanadnagar Police Station Dharashiv)  संपर्क केला तेव्हा त्यांच्यावर अपहरणाच गुन्हा दाखल असल्याचे समजले मेत्रेवार यांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले व मुलीची सुखरूप सुटका करण्यात आली.

Post a Comment

0 Comments