हृदयद्रावक घटना : तणनाशकाची फवारणी करताना विषबाधा होऊन दोघा शेतकऱ्यांचा उपचारादरम्यान मृत्यू ! लातूर जिल्ह्यातील घटना-
लातूर /प्रतिनिधी रूपेश डोलारे : चाकूर तालुक्यातील अजनसोंडा बुद्रुक येथे शेतात त्यांना तणनाशकाची फवारणी करताना विषबाधा होऊन एका शेतकऱ्याचा शुक्रवारी तर दुसऱ्या शेतकऱ्याचा शनिवारी लातूर येथील खाजगी दवाखान्यात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.
या घटनेबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की चाकूर तालुक्यातील अजनसोंडा बुद्रुक येथे १३ नोव्हेंबर रोजी अंगद ज्ञानोबा भालेराव वय (54) व लिंबाजी निवृत्ती गवळी वय (58) हे दोघे शेतात तन नाशक औषधाची फवारणी करत असताना विषबाधा झाली. उलटी आणि अस्वस्थ वाटू लागल्याने लिंबाजी गवळी यांना चाकुर येथील खाजगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून लातूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. दिनांक 14 नोव्हेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाला तर अंगद भालेराव यांना अस्वस्थ होऊ लागल्याने हाळी तालुका उदगीर येथे प्राथमिक उपचार करून लातूर येथे दाखल करण्यात आले होते. त्यांचा दिनांक 15 नोव्हेंबर रोजी मृत्यू झाला या दोघांच्या मृतदेहावर शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.
अंगद भालेराव यांच्या पश्चात आई पत्नी तीन मुले दोन मुली असा परिवार आहे तर लिंबाजी गवळी यांच्या पश्चात आई-वडील पत्नी दोन मुले असा परिवार आहे या घटनेची माहिती मिळताच तहसीलचे मंडळ अधिकारी निळकंठ केंद्रे ,तलाठी मुक्ता भूरकापल्ले यांनी दोन्ही कुटुंबीयांची सोमवारी भेट घेऊन माहिती घेतली. दोघेही जिवलग मित्र व शेत शेजारी होते विषबाधेमुळे दोघांचाही मृत्यू झाल्याने परिसरात हळूहळू व्यक्त केली जात आहे.

0 Comments