खळबळ जनक घटना :क्षुल्लक कारणावरून मुलांनी केला बापाचा खून, खुन करून मृतदेह घरात पुरला - आठ दिवसांनी दुर्गंधी सुटल्याने फुटले बिंग -
छत्रपतीसंभाजीनगर : क्षुल्लक कारणावरून मुलाने बापाचा खून करून मृतदेह घरात पुरला. दुर्गंधी पसरल्याने 8 दिवसानंतर शनिवारी दि, 22 रोजी दुपारी या खुनाला वाचा फुटली. पैठण तालुक्यातील कडेठाण येथे घडलेल्या या घटनेतील आरोपी मुलास पाचोड पोलिसांनी अटक केली आहे या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
या घटनेबाबत पोलीसांकडुन मिळालेली सविस्तर माहिती अशी की, कल्याण बापूराव काळे वय (65) असे खून झालेल्या पित्याचे नाव असून रामेश्वर काळे वय (28) असे आरोपी मुलाचे नाव आहे. खून करण्यात आलेल्या कल्याण काळे यास दोन मुले, एक मुलगी आहे. मोठा मुलगा ऊसतोडीसाठी केलेला होता. कल्याण काळे पत्नीसह मुलगा रामेश्वर यांच्यासोबत राहत होते. १० दिवसांपूर्वी या बाप-लेकात वाद हाणामारी झाली होती. यात कल्याण याचा मृत्यू झाला मात्र या घटनेचा कानोसा कोणालाही लागू नये म्हणून रामेश्वर ने आपल्या बापाला राहत्या घरातच खोल खड्डा करून पुरले होते.
मयत कल्याण यांची बायको सुमनबाई ही भोळसर असलेली तिन्ही या घटनेची माहिती कोणालाही दिली नाही मात्र आठ दिवसानंतर या कुजलेल्या मृतदेहाची मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटल्याने या खुनाला वाचा फुटली. पाचोडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडित, पोलीस उपनिरीक्षक राम बारहाते यांच्यासह मोठा पोलीस फौज फाटा घटनास्थळी दाखल झाला. सदरची माहिती वरिष्ठांना दिल्यानंतर महसूल कर्मचारी फॉरेन्सिक पथक ही घटनास्थळी दाखल झाले होते. कल्याण काळे यांचा मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला पोलिसांनी आरोपी रामेश्वरला ताब्यात घेऊन चौकशी केली असता किरकोळवादातून लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्यांने वडिलांचा मृत्यू झाल्याची कबुली त्यांनी दिली. याप्रकरणी पाचोड पोलीस ठाण्यात मुलाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडित हे करत आहे.
पंधरा वर्षांपूर्वी मयतानी केला होता पोटच्या मुलीवर अत्याचार
या घटनेविषयी आणखीन एक धक्कादायक माहिती समोर आली आहे यामधील मयत कल्याण बापूराव काळे यांनी पंधरा वर्षांपूर्वी स्वतःच्या पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला होता. या गंभीर गुन्ह्यात त्याने शिक्षाही भोगुन आला होता

0 Comments