जुन्या भांडणाच्या रागातून स्प्रिंकलर पाईप जाळले; तीन जनावर नळदुर्ग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल-
धाराशिव : जुन्या भांडणातून ऊसातील पीव्हीसी व स्पिंकलर पाईप जाळले ही घटना तुळजापूर तालुक्यातील गंधोरा शिवारात दि,21 रोजी घडली. याप्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात तीन जणांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की गंधोरा येथील नामदेव धर्मा राठोड ,शांताबाई नामदेव राठोड व सविता नामदेव राठोड यांनी दिनांक 21 नोव्हेंबर रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास गंधोरा शहरातील सतीश शहाजी भोसले राहणार गंधोरा यांच्या सुनेचा ऊस पेटवून दिला यामध्ये ऊसातील पीव्हीसी पाईप स्पिंकलर पाईप जळून जवळपास चार लाखाचे नुकसान झाले या प्रकरणी सतीश भोसले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शुक्रवार दिनांक 21 रोजी नळदुर्ग पोलीस ठाण्यात न्याय संहिता कलम 326(एफ),3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या घटनेचा अधिक तपास नळदृग पोलीस करत आहेत.

0 Comments