रेशन दुकानदाराकडून ५७०० रुपयाची लाच घेताना महिला नायब तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात,; नांदेड लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई-
नांदेड : हदगाव तहसील कार्यालय मधील पुरवठा विभागात नायब तहसीलदार पदावर काम करणाऱ्या सुमन कराळे यांनी रेशन दुकानदाराकडून 5700 रुपयाची लाच घेताना नांदेड येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले.
या घटनेबाबत एसीबी कडून मिळालेली अधिक माहिती अशी की तक्रारदाराचे स्वतःच्या नावावर रेशन धान्य वितरण दुकान आहे .तक्रारदार यांना मागील चार महिन्यात झालेल्या धान्य पुरवठ्याचे कमिशन म्हणून 57000₹ मिळाले होते. सध्या त्यांना माहे नोव्हेंबर 2025 चे रेशन प्राप्त झाले असून पुरवठा निरीक्षक यांनी इ-पाॅज या मशीनवर अपलोड केले नाही. ज्यामुळे पुढील रेशन वाटप करता येणार नव्हते तसेच 27 नवीन लाभार्थी यांचे नाव ऑनलाईन करण्यासाठी दिनांक 18 नोव्हेंबर रोजी तक्रारदार यांनी पुरवठा निरीक्षक सुमन कराळे यांची तहसील कार्यालयात हदगाव येथे जाऊन भेट घेतली तेथे त्यांनी त्यांची कंत्राटी संगणक डेटा ऑपरेटर गोविंदा जाधव यांना बोलवून त्यांच्या समक्ष तक्रार यांना माहे 2025 चे रेशन ई-पाॅज मशीनवर अपलोड करण्यासाठी व 27 नवीन लाभार्थ्याचे नाव ऑनलाईन करण्यासाठी तसेच कमिशन पोटी शासनाकडून मिळालेले 57 हजार रुपयांचे 20 टक्के रक्कम लाच म्हणून मागितली व गोविंद जाधव यांनी देखील तीच मागणी केली अशी तक्रार दिनांक 20 नोव्हेंबर रोजी तक्रारदारांनी दिली होती.
यानंतर पुरवठा निरीक्षक सुमन कराळे यांनी सांगितल्याप्रमाणे शनिवारी दिनांक 22 रोजी तक्रारदाराने कंत्राटी संगणक डेटा एन्ट्री ऑपरेटर गोविंदा जाधव यांना 5700 रुपयांची लाच दिली आणि त्यांनी ती स्वीकारली असता लाच लचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकाऱ्यांनी सापळा रुचून पकडले .शनिवारी दि,२२रोजी दुपारी साडेतीन वाजता कारवाई केल्याची समजते तहसील कार्यालयीन तहसीलदार सुमन कराळे संगणक परिचारक गोविंद जाधव आणि अन्य एक जण यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी यांना ताब्यात घेऊन साडेचार वाजता पोलीस ठाण्यात आणले होते.
पुरवठा विभागाचे विविध कामासाठी रेट कार्ड
सध्या अनेक लोकांकडे रेशन कार्ड नाही किंवा रेशन कार्ड बनवून घेण्यासाठी ऑनलाईन केलेले आहेत परंतु हदगाव तहसील कार्यालयात राशन कार्ड उपलब्ध नाहीत या नावाखाली मागील एक वर्षापासून नागरिकांना टोलवाटोलवीची उत्तरे दिली जात आहेत पुरवठा विभागात जणू काही रेट कार्ड असल्याप्रमाणे अनेक कामाचे भाव ठरवले गेले आहेत.

0 Comments