होर्टी शिवारातून २ दोन शेतकऱ्याचे विद्युत पंप लंपास, तात्काळ चोरट्यांच्या मुसक्या आवळ्याची शेतकऱ्यातून मागणी नळदृग पोलीस स्टेशन मध्ये अज्ञात चोरटे विरुद्ध गुन्हा दाखल-Naldurg Police Station Crime News

Hot Posts

6/recent/ticker-posts

होर्टी शिवारातून २ दोन शेतकऱ्याचे विद्युत पंप लंपास, तात्काळ चोरट्यांच्या मुसक्या आवळ्याची शेतकऱ्यातून मागणी नळदृग पोलीस स्टेशन मध्ये अज्ञात चोरटे विरुद्ध गुन्हा दाखल-Naldurg Police Station Crime News

होर्टी शिवारातून २ दोन शेतकऱ्याचे विद्युत पंप लंपास, तात्काळ चोरट्यांच्या मुसक्या आवळ्याची शेतकऱ्यातून मागणी नळदृग पोलीस स्टेशन मध्ये अज्ञात चोरटे विरुद्ध गुन्हा दाखल- 


धाराशिव : तुळजापूर तालुक्यातील होर्टी शिवारातील शेतकरी अंकुश भोसले यांच्या शेतातील 5 एचपी चे इलेक्ट्रिक पाणबुडी मोटर चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे याप्रकरणी शेतकरी भोसले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरटेविरुद्ध नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

 या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की तुळजापूर तालुक्यातील शेतकरी अंकुश महादेव भोसले, वय 30 वर्षे, रा. होर्टी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांचे होर्टी शिवारातील शेत गट नं 436 मधील विहीरीमधुन लाडा कंपनीची 5 एचपी ची ईलेक्ट्रीक पाणबुडी मोटार अंदाजे 10,000₹ किंमतीची  मोटर अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-अंकुश भोसले यांनी दि.29.11.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

याचबरोबर तुळजापूर तालुक्यातील चिकुंद्रा येथील शेतकरी लक्ष्मण गायकवाड यांची होर्टी शिवारातील तलावा मधून विद्युत पंप चोरून नेण्याची घटना घडली आहे याप्रकरणी शेतकरी गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरटेविरुद्ध नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेले अधिक माहिती अशी की तुळजापूर तालुक्यातील चिकुंद्रा येथील नामे- लक्ष्मण रंगराव गायकवाड, वय 65वर्षे, रा. चिकुंद्रा ता. तुळजापूर जि. धाराशिव यांचे होर्टी शिवारातील तलावामधुन अंदाजे 20,000₹ किंमतीची सीआरआय कंपनीची 7.5 एच पी ची ईलेक्ट्रीक मोटार अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- लक्ष्मण गायकवाड यांनी दि.29.11.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.  परिसरात  एका पाठोपाठ एक चोरीच्या घटनेमुळे शेतकरी वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे याप्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी लक्ष घालून तात्काळ या चोरट्यांच्या मुसक्या  आवळण्यात यावे अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

Post a Comment

0 Comments