जेवण वाढण्यास नकार दिल्याने पत्नीचा कुऱ्हाडीने खुन, आरोपी पती स्वतः पोलीस ठाण्यात हजर लातूर जिल्ह्यातील घटना-
लातूर : जेवण वाढण्यास नकार दिल्याचा राग अनावर झालेल्या पतीने घरातील पत्र्याचे आडून अडकलेली कुऱ्हाडीने काढून पतीच्या डोक्यात घालून तिचा खून केल्याची धक्कादाय घडणाऱ्यांना रेणापुर तालुक्यातील घनसरगाव शिवारातील शेतातील वस्तीवर शनिवार दिनांक 29 रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. मीराबाई चंद्रकांत मदने वय ४५ असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे विशेष म्हणजे खून करून आरोपी चंद्रकांत मदने हा रक्ताने माखलेल्या अवस्थेत रेनापुर पोलीस ठाण्यात स्वतः हजर झाला होता.
या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की चंद्रकांत बाबुराव माने वय 55 (राहणार घनसर गाव तालुका रेनापुर जिल्हा लातूर) यांची घनसरगाव शिवारात गट नंबर 227 मध्ये शेती असून या शेतात त्याचे पत्र्याचे शेड उभारले आहे शनिवारी दुपारी ३ वाजता सुमारा समीराबाई चंद्रकांत मदने वय 45 यांना चंद्रकांत मदने यांनी मला जेवायला वाढ अशी सांगितले तेव्हा पत्नी मीराबाई मी वाढणार नाही तुम्हीच स्वतः वाढून घ्या असे सांगितले तेव्हा पती-पत्नीमध्ये किरकोळ वाद झाला . यामध्ये पती चंद्रकांत मदने याला राग अनावर झाल्याने त्यांनी शेड मधील कुऱ्हाडीने पत्नी मीराबाई यांच्या डोक्यात दोन जबर वार केले यातील गंभीर जखमी होऊन जागीच मरण पावली.
दरम्यान या घटनेनंतर चंद्रकांत मदने हा रक्ताने माखलेल्या कपड्यास रेनापुर पोलीस ठाण्यात स्वतः दाखल झाला हे दृश्य पाहून पोलीस अवाक झाले पोलीस कर्मचारी बालाजी डफडवाड यांनी चंद्रकांत मदने यांचा मुलगा ज्ञानेश्वर यांच्या भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून सदर घटनेबद्दल माहिती दिली. आपल्या घरात किंवा शेतात काय घटना घडली आहे का हे पाहण्यास सांगितले तेव्हा आपल्या वडिलांनी आईच्या डोक्यात जबर वार करून ठार केल्याची त्यांनी सांगितले त्यावरून उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधरी पोलीस निरीक्षक सुधाकर देणे पोलीस उपनिरीक्षक राम धन डोईफोडे बी टी जमादार बालाजी टप्पडवार यांचा तात्काळ घटनास्थळी गणेशगाव येथे शेतात धाव घेत पंचनामा केला. सदर घटना शनिवारी दुपारी घडली सदर आरोपी पतीविरुद्ध रेनापुर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


0 Comments