रुई (ढोकी) येथील रेल्वे फाटका जवळील जळीत तरुणीचा खून प्रकरणाचा उलगडा, मयत तरुणीची ओळख पटली अपहरण करून खून, एकास अटक -
धाराशिव : धाराशिव तालुक्यातील रुई (ढोकी) रेल्वे फाटकाजवळ मागील दोन दिवसांपूर्वी अज्ञात तरुणीचा मृतदेह जळालेला अवस्थेत आढळून आला होता याप्रकरणी ढोकी पोलीस स्टेशन येथे या गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. ढोकी पोलिसांनी तात्काळ या घटनेचा तपास करून पोलिसांना मोठे यश आले आहे. पुणे येथून एका तरुणाने महिलेचे अपहरण करून खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळून टाकल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे प्रेम संबंधातून खून केली असल्याची कबुली आरोपीने दिली आहे.अनिकेत कांबळे असे कोण करणारे आरोपीचे नाव आहे.
![]() |
| मयत तरुणीचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह |
या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, दि,27 नोव्हेंबर रोजी 06.00 वा. पुर्वी ढोकी शिवारातील अंकुश पंडीत बोडके यांचे शेत गट नं 532 चे लगत ढोकी धाराशिव जाणारे रोडचे उजव्या बाजूस रेल्वे पटरी पासुन 300 मिटर अंतरावर एक अनोळखी महिला मयत वय 18 ते 23 वर्षे हिस अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरुन डोक्यात धारदार शस्त्राने वार करुन जिवे ठार मारुन पुराव नष्ट करण्याचे उद्देशाने तिचा मृतदेह अर्धवट जाळुन पुरावा नष्ट करण्याच प्रयत्न केला होता. याप्रकरणी फिर्यादी पोलीस पाटील राहुल माणिक वाकुरे, यांनी दि.27.11.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पो ठाणे ढोकी येथे भा.न्या.सं.कलम 103(1), 238 अन्वये गुन्हा नोंदवला होता. त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास चक्री फिरवत उलगडा केला आहे पुणे येथील वाकड पोलीस स्टेशनमध्ये एक महिला बेपत्ता झाल्याची तक्रार प्राप्त झाली होती, ही महिला आपल्या मुलांना शाळेत सोडण्यासाठी गेली असता तिथून आरोपीने अपहरण केले होते.
याचे तपासासाठी डोकी पोलिसांनी मराठवाड्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या व्हाट्सअप ग्रुप वर या जळालेल्या अवस्थेतील मृतदेहाचे फोटो सर्व माहिती शेअर केली होती यामध्ये संबंधित महिलेची पुणे येथील वाकड पोलीस स्टेशनमध्ये मिसिंग नोंद केली होती यावरून वाकड पोलिसांनी ढोकी पोलीसाची संपर्क करून अधिक माहिती घेऊन तेथे दाखल असलेल्या एका मिसिंग प्रकरणातील महिलेच्या नातेवाईकांना बोलवून फोटो दाखवला यावेळी त्यांनी ओळख पटवल्यानंतर फिर्यादीत संशयित म्हणून उल्लेख केलेल्या अनिकेत महादेव कांबळे (रा.नितळी जि.लातुर)याला ताब्यात घेतले त्यांनी या खुनाची कबुली ही दिली दरम्यान ढोकी पोलिसांनी मुख्य आरोपी अनिकेत महादेव कांबळे यास वाकड पोलिसांकडून ताब्यात घेतले असून तपास पोलीस अधीक्षक रितू खोकर पोलीस उपाधीक्षक संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास हजारे करत आहेत.
प्रेम प्रकरणातून केले कांड; आरोपीची कबुली
संबंधित माहित महिलेबाबत 19 नोव्हेंबर रोजी पुण्यातील वाकड पोलीस ठाण्यात बेपत्ता मिसिंग नोंद झाली होती याच्या तपासा दरम्यान पोलिसांना हे प्रकरण प्रेम संबंधातून घडण्याची निष्पन्न झाले आहे तसेच ही महिला आपल्या मुलांना शाळेत सोडण्यासाठी गेली असता आरोपीने तेथूनच तिची अपहरण केल्याचे समोर आले आरोपीने ठोकी येथे रेल्वे गेट जवळ बोडके यांच्या उसाच्या शेतात तिची निर्गुण खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळल्याची कबुली ही दिली आहे यावरून संबंधित तरुणाविरुद्ध ढोकी पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मयत महिलेच्या नातेवाईकांनी डोकी पोलीस स्टेशन येथे गर्दी केली होती मयत महिलेच्या नातेवाईकांनी संबंधित आरोपीवर कठोरात कठोर शासन करण्यात यावे अशी मागणी माध्यमांशी बोलताना केली आहे.


0 Comments