धाराशिव - आळणी येथे शौचालय अनुदान घोटाळा उघडकीस, मठाच्या जमिनीवर बेकायदेशीर कब्जा सरपंच, ग्रामसेवकासह ७ जणांवर गुन्हा दाखल
धाराशिव/प्रतिनिधी रूपेश डोलारे : धाराशिव तालुक्यातील आळणी येथील सरपंच ग्रामसेवक यांच्यासह एकाच कुटुंबातील 7 सदस्यावर बनावट दस्त तयार करून शौचालयाचे अनुदान अपहर तसेच जंगम मताच्या जमिनीवर बेकायदेशीर कब्जा केल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेबाबत पोलिसांकडुन मिळालेली अधिक माहिती अशी की, आरोपी नामे-महानंदा संतोष चौगुले, वय 35 वर्षे, सरपंच रा. आळणी, सुयज्ञ वशिष्ठ मैंदाड, वय 50 वर्षे, ग्रामसेवक, रा. चोराखळी ता. कळंब जि. धाराशिव, बबन विठ्ठल माळी, वय 64 वर्षे, गयाबाई बबन माळी, वय 60 वर्षे,धनंजय बबन माळी, वय 45 वर्षे, तानाजी विठ्ठल माळी, वय 50 वर्षे, फुलचंद सदाशिव माळी, वय 40 वर्षे, सर्व रा. आळणी ता. जि. धाराशिव यांनी 2016 ते 2021 दि.29.08.2024 रोजी आळणी येथे स्वताचा फायदा करुन घेण्यासाठी संगणमत करुन बनावट दस्त तयार करुन शौचालयाचे अनुदान उचलुन शासनाची, फसवणुक केली, तसेच जंगम मठाच्या जमीनीवर ही काही व्यक्तींनी कब्जा केला आहे. व त्या जमिनीचे देखील बनावट दस्त तयार करुन अनुदान उचलन शासकीय रक्कमेचा अपहार केला आहे. बीएनएसएस कलम 175 (3) प्रमाणे तपास करणे बाबत मा. 05 न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग धाराशिव यांचे आदेशान्वये फिर्यादी नामे-अंबऋषी अर्जुन कोरे, वय 62 वर्षे, रा. आळणी ता.जि. धाराशिव यांनी दि.18.11.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पो ठाणे धाराशिव ग्रामीण येथे भा.न्या.सं.कलम 316(5), 318(4), 338 (3), 336(3), 340(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

0 Comments