तुळजापूर :बनावट अधिकार पत्र बनवून जमीन मालकाची व शासनाची फसवणूक दिल्लीतील एक जणांसह ५ जणांवर गुन्हा दाखल--Power of Attorney Fraud Land owner Tuljapur Crime News

Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापूर :बनावट अधिकार पत्र बनवून जमीन मालकाची व शासनाची फसवणूक दिल्लीतील एक जणांसह ५ जणांवर गुन्हा दाखल--Power of Attorney Fraud Land owner Tuljapur Crime News

तुळजापूर :बनावट अधिकार पत्र बनवून जमीन मालकाची व शासनाची फसवणूक दिल्लीतील एक जणांसह ५ जणांवर गुन्हा दाखल-- तुळजापूर तालुक्यातील जमिनीची दिल्ली कनेक्शन


धाराशिव/प्रतिनिधी रूपेश डोलारे  : तुळजापूर तालुक्यातील खडकी येथील शेत जमिनीचे चक्क दिल्ली येथे बनावट अधिकार पत्र बनवून जमिनीची मूळ मालक व शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात सहा जणाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की ,आरोपी नामे-अजयकुमार यादव रा. एच 305-302 साध नगर पालम गाव दिल्ली,110045, झापू लक्ष्मण राठोड, नितीन शाम भंडारे, शिवाजी अंबादास जवान तिघे रा. खडकी ता. तुळजापूर,जि. धाराशिव, अय्युब राजन पटेल, रा. बोरामणी ता. द. सोलापूर जि. सोलापूर, संदीप नवनाथ पाटील, रा. मुळेगाव तांडा ता. द. सोलापूर जि. सोलापूर, यांनी दि.30.06.2025 रोजी 10.00 ते दि.08.09.2025 रोजी 18.25 वा. सु. दिल्ली दुय्यम निबंधक क्र 9 कपक्षेत्र नवी दिल्ली, तुळजापूर दुय्यम निबंधक कार्यालय तुळजापूर येथे  खडकी ता. तुळजापूर येथील जमीन गट नं 41 क्षेत्र 02 हेक्टर 85 आर या जमिनीचे मुळ मालक  अशोक गणपतराव  दिक्षीत व इतर पाच यांचे दिल्ली  या ठिकाणी बनावट अधिकार पत्र/ कुलमुखत्यार पत्र बनवून हे खरे आहे असे भासवून खोटा दस्तऐवज तयार करुन जमिनीचे मुळ मालक यांची व शासनाची फसणवुक केली. 

अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-बालाजी मादसवार यांनी दि.17.11.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पो ठाणे तुळजापूर येथे भा.न्या.सं.कलम 318(4), 336(2), 336 (3), 338(3), 340(2)  सह 85 भा. नोंदणी अधिनियम 1908 अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास तुळजापूर पोलीस करत आहेत.


Post a Comment

0 Comments