तुळजापूर :कुंभारी येथे अवैद्य दारू विक्री करणाऱ्यावर अड्ड्यावर पोलिसांचा छापा ; तुळजापूर पोलीस ठाणे पथकाची कारवाई-
तुळजापूर : तालुक्यातील कुंभारी येथे राहत्या घरासमोर अवैद्य गावठी दारू विक्री करणाऱ्या आरोपीस तुळजापूर पोलीस ठाण्याच्या पथकाने छापा टाकून जप्त करण्यात आली आहे.
या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की-सुधाकर शिवाजी शिंदे, वय 48 वर्षे, (रा.कुंभारी ता. तुळजापूर जि.धाराशिव) हे 11.15 वा. सु.कुंभारी येथे आपल्या राहत्या घरासमोर अंदाजे 1,800 किंमतीची 20 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. याचबरोबर-शशिकांत कुमार तांबे, वय 36 वर्षे, रा.कुंभारी ता. तुळजापूर जि. धाराशिव हे 12.00 वा. सु. कुंभारी ते कदमवाउी रोडलगत अंदाजे 1,120 किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या28 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेले जप्त करण्यात आले. या कारवाईमुळे अवैद्य दारू विक्री करणाऱ्या व्यावसायिकाचे धाबे दणाणले आहेत.

0 Comments