आईने मोबाईल न दिल्याने अल्पवयीन मुलीची आत्महत्या,लातुर जिल्हातील घटना -Suicide News Latur Iti College Student

Hot Posts

6/recent/ticker-posts

आईने मोबाईल न दिल्याने अल्पवयीन मुलीची आत्महत्या,लातुर जिल्हातील घटना -Suicide News Latur Iti College Student

लातुर: आईने मोबाईल न दिल्याने अल्पवयीन मुलीची आत्महत्या,लातुर जिल्हातील घटना -    


लातूर : मुलांमध्ये दिवसेंदिवस मोबाईलचे व्यसन इतके वाढत चालली आहे की मुले आता मैदानी खेळ पूर्णपणे विसरले आहेत पालकाकडे मुले सतत मोबाईलचा तगादा लावत असल्याने हल्ली बहुतेक घरात मोबाईल वरून पालक आणि मुलात वाद होताना दिसतात .असाच घटना मोबाईल न दिल्याचा राग अनावर झाल्याने एका अल्पवयीन मुलीने स्वतःच्या घरात गळफास घेऊन जीवन संपवलयाची   धक्कादायक घटना रेणापूर तालुक्यातील कामखेडा येथे सोमवार दि, 24 रोजी सायंकाळी पाच वाजता सुमारास घडली. आत्महत्या केलेल्या अल्पवयीन मुलीचे नाव समीक्षा बाबुराव सोमवंशी वय (17) राहणार कामखेडा तालुका रेनापुर जिल्हा लातूर अशी आहे.

या घटनेबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की मयत समीक्षा ही रेणापूर येथील शासकीय औद्योगिक  प्रशिक्षण संस्थेत आयटीआय शिक्षण घेत होती. तिने पाहण्यासाठी आईकडे मोबाईल मागितला होता आईने तिला मोबाईल न  नसल्याने समीक्षा हिला राग आला या रागाच्या भरात तिने स्वतःच्या घरात सिलिंग फॅनला दोरी बांधून गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना दत्तात्रय सौदागर सोमवंशी यांनी रेनापुर पोलिसांना कळवली त्यावरून रेणापूरचे पोलीस घटनास्थळी गेली पंचनामा केला मयत समीक्षा हिला पानगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी हलवण्यात आले.

मंगळवारी दि, 25 रोजी कामखेडा येथे तिच्या पार्थिवावर अंत्य संस्कार करण्यात आले याप्रकरणी रेणापुर पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक  तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदलाल चौधरी हे करत आहेत.

पाच दिवसांपूर्वी नागपुरात घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती

मोबाईल दिला नाही म्हणून राग आल्याने आठवीत शिकणाऱ्या १३ वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली .मृत  दिव्या सुरेश कोठारे अशी आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे चणकापूर येथील जय भोले नगर परिसरात शुक्रवार दिनांक 21 रोजी संध्याकाळी घटना घडली.दिव्या कोठारी ही चणकापूर येथील वार्ड क्रमांक 1 मधील महात्मा फुले शाळेत आठवी शिकत होती तिचे कुटुंबवॉर्ड क्रमांक 6 हनुमान नगर येथे राहत होते.24 नोवेंबर रोजी तिच्या आत्याच्या मुलीचे लग्न असल्याने शुक्रवारी दिव्य आणि तिची आई वडील तसेच कुटुंबीय आत्याकडे कार्यक्रमासाठी गेले होते. दिव्याची आत्याही घरापासून काही अंतरावरच राहते दिव्याने संध्याकाळी साडेसातच्या सुमारास आईस मोबाईल मागितला मोबाईल न दिल्याने दिव्या नाराज झाली रागाच्या भरात ती अत्याच्या घरातून निघून सरळ घरी आली तेव्हा घरी कोणीच नव्हते घरात बांधलेल्या पाळण्याच्या दोरीला तिने गळफास घेतला.अशाच प्रकारच्या ही घटना घडली असल्याची चर्चा परिसरात  होत आहे .

Post a Comment

0 Comments