तुळजापुर - बस मध्ये चढताना महिलेच्या गळ्यातील सोन साखळी लंपास, तुळजापूर बस स्थानकामध्ये चोरीची सत्र सुरूच -Tuljapur Robbery Crime News

Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापुर - बस मध्ये चढताना महिलेच्या गळ्यातील सोन साखळी लंपास, तुळजापूर बस स्थानकामध्ये चोरीची सत्र सुरूच -Tuljapur Robbery Crime News

तुळजापुर - बस मध्ये चढताना महिलेच्या गळ्यातील सोन साखळी लंपास, तुळजापूर बस स्थानकामध्ये चोरीची सत्र सुरूच - 

प्रातिनिधीक फोटो

तुळजापूर/बिभिषन मिटकरी  : बस मध्ये चढत असताना महिला प्रवाशाच्या गळ्यातील 20 ग्रॅम वजनाच्या सोन्याची चैन लंपास केल्याची घटना दिनांक 11 रोजी घडली याप्रकरणी  फिर्यादी वडला भारती यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तुळजापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 या घटनेबाबत पोलिसाकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, तुळजापूर बस स्थानकामध्ये वडला विठ्ठल भारती ( रा. जेडीमेटला साईबाबा नगर पांडु वस्ती  सुररम ता. कुदबुलपापुर  जि. रंगारेड्डी  राज्य आंध्रप्रदेश )या दि,.11.11.2025 रोजी  18.30 वा. सु. बसस्थानक तुळजापूर येथे  बसमध्ये चढत असताना अज्ञात व्यक्तीने गर्दीचा फायदा घेवून  वडला भारती यांचे गळ्यातील 20 ग्रॅम वजनाचे सोन्याची चैन अंदाजे 80,000₹ किंमतीची चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-वडला भारती यांनी दि.24.11.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. मागील वर्षभरापासून तुळजापूर बस स्थानकामध्ये चोरीचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे प्रवाशासह भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे याप्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी लक्ष घालून या चोरट्याचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी भाविकांसह प्रवाशातून होत आहे

Post a Comment

0 Comments