नगरपालिका निवडणुकीचे रणांगण तापले- नाराजी नाट्यने चढाओढ वाढली, संपर्क मोहिमेला आला वेग -Nagarpalika Election News Dharashiv

Hot Posts

6/recent/ticker-posts

नगरपालिका निवडणुकीचे रणांगण तापले- नाराजी नाट्यने चढाओढ वाढली, संपर्क मोहिमेला आला वेग -Nagarpalika Election News Dharashiv

नगरपालिका निवडणुकीचे रणांगण तापले- नाराजी नाट्यने चढाओढ वाढली, संपर्क मोहिमेला आला वेग - 


धाराशिव/ प्रतिनिधी रुपेश डोलारे - धाराशिव जिल्ह्यात 8 नगराध्यक्ष पदासाठी तर  तर 188  नगरसेवक पदासाठी   नगरपालिकेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून जवळपास तीन वर्षाच्या प्रत्यक्ष नंतर होत असलेल्या या निवडणूक मैदानात भाऊगर्दी झाली आहे. परिणामी नाराजीच्या खेळाणे राजकीय वातावरण चांगले तापले आहे. नगरपालिकेच्या सत्तेची घडी बसवण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली असली तरी मतदार राजा आपल्या अमूल्य मताचे दान कोणाच्या पारड्यात टाकणार हे ३ डिसेंबरला कळणार आहे. धाराशिव जिल्ह्यात 8 नगराध्यक्ष पदासाठी 38 उमेदवारांनी अर्ज कायम ठेवले आहे तर  188 नगरसेवक  पदासाठी 683 उमेदवारांनी रिंगणात उतरले आहेत.

जिल्ह्यात नगरपालिकेच्या निवडणुकीत  जुन्या सह अनेक नव्या चेहऱ्यांना राजकीय व्यासपीठ मिळावयाचे असून त्या दृष्टीने ते प्रयत्नाची पराकाष्टा करीत आहेत प्रामुख्याने युवा कार्यकर्त्यांची उत्सुकता वाढली असून मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी विविध उपाययोजना  राबवल्या जात आहेत. पक्षांतर्गत बंडाळी तिकीट नाकारल्याची नाराजी यांनी काही ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये धुसफुस यामुळे निवडणूक अधिकच रंगतदार बनली आहे. काही इच्छुकांना तिकीट न मिळाल्याने ते अपक्ष म्हणून रिंगणात उतरले असून अधिकृत उमेदवारासमोर मोठे आव्हान उभे केली आहे त्यामुळे प्रमुख पक्षाच्या रणनीतीही बदल होताना दिसत आहे.

मतदारापर्यंत विकासाचे आश्वासन पोहोचण्यासाठी सभा पासून घरदार,संपर्क मोहिमेला वेळ आला आहे. पाणीपुरवठा, रस्त्याची दुरवस्था ,स्वच्छता प्रकाशयोजना आणि मूलभूत सुविधांचा उभारणीपर्यंत उमेदवाराकडून आश्वासने दिली जात आहेत. तीन वर्षे निवडणुकां न झाल्याने नागरिकांच्या अपेक्षाही मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत.  


Post a Comment

0 Comments