व्हिडिओ चित्रीकरण व्हायरल करण्याची धमकी देत व मुलीच्या लग्नाचे, शिक्षणाच्या जबाबदारीचे आमिष दाखवुन ४९ वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल धाराशिव जिल्ह्यातील घटना-
धाराशिव/प्रतिनिधी रूपेश डोलारे : धाराशिव तालुक्यातील एका गावातील ४९ वर्षीय महिलेवर गावातील एका तरुणाने व्हिडिओ चित्रकरण व्हायरल करण्याची धमकी देत लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात तरुणा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेबाबत पोलिसांना मिळालेली सविस्तर माहिती अशी की, धाराशिव तालुक्यातील एका गावातील 49 वर्षीय महिला सन 2022 ते दि.08.11.2025 रोजी दरम्यान गावातील एका तरुणाने महिला ही अनुसुचित जातीचे आहे हे माहित असतानाही तीला बायको सारखे वागवून दोन मुलीच्या शिक्षणाची व लग्नाची जबाबदारी घेतो अशी फसवणुक करुन अमिष दाखवून वेगवेगळ्या ठिकाणी नेवून तिच्यावर लैंगीक अत्याचार करुन त्याचे व्हिडीओ चित्रीकरण करुन व्हयरल करण्याची व तु पोलीसांकडे गेली तर तुला व तुझे मुलींना सोडणार नाही अशी धमकी दिली. अशा मजकुराच्या पिडीतेने दि.24.11.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.न्या.सं.कलम-69,351(2) सह अ.जा.ज.प्र.कायदा कलम 3(2) (व्हिए) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास धाराशिव ग्रामीण पोलीस करत आहेत.

0 Comments