प्रेमसंबंधातून 22 वर्षीय तृतीयपंथीयाची गळफास घेऊन आत्महत्या; प्रियकराचे लग्न होणार असल्याचा धक्का सहन न झाल्याने टोकाचा निर्णय, आत्महत्या पूर्वी व्हिडिओ केला रेकॉर्ड सोलापूर जिल्ह्यातील घटना-
सोलापूर: गेल्या आठ वर्षापासून असलेल्या प्रेमप्रकरणाची सांगता आत्महत्येन झाली प्रियकराचे लग्न होणार आहे हा धक्का सहन झाल्याने एका २२ वर्षीय तृतीयपंथीनी गुरुवारी दि,४ रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
प्रकाश व्यंकपा कोळी वय 22 (रा. साईनगर बाळे सोलापूर) असे मयत तृतीय पंथीयाचे नाव आहे. या घटनेबाबत मिळालेली अधिक माहिती अशी मयत प्रकाश कोळी यांचे एका तरुणाशी आठ वर्षापासून प्रेम संबंध होते .त्यात तरुणाचे लग्न ठरले होते आणि गुरुवारीच हळदीचा कार्यक्रम होता दरम्यान अनेक वर्षापासून प्रियकर प्रकाशला छळत होता त्याने प्रकाश ची साथ अचानक सोडली होती आणि लग्नाचे निर्णय घेतला हा प्रियकराचा घेतलेल्या निर्णय सहन झाल्याने प्रकाशने आपल्या राहत्या घरात पत्राच्या अँगल ला ओढणीच्या दोरीच्या साह्याने गळफास घेतला. आजूबाजूच्या लोकांनी व नातेवाईकांनाही घटना कळल्यानंतर त्यांनी बेशुद्ध अवस्थेतच असलेल्या प्रकाशला सोलापूरच्या सिविल रुग्णालयात दाखल केली परंतु उपचारापूर्वी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मृत्यू झाल्याची घोषित केले. या घटनेची प्राथमिक नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली ही बातमी कळतात सोलापूर शहरातील शेकडो तृतीयपंथी यांनी रुग्णालय बाहेर मोठी गर्दी केली होती .यावेळी प्रकाशच्या बहिणीचा व उपस्थित तृतीयपंथीयांचा आक्रोश मन हे लावून टाकणारा होता . या घटनेचा अधिक तपास फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे कर्मचारी करत आहे. आत्महत्या पूर्वी प्रकाशने एक व्हिडिओ रेकॉर्डिंग केला या व्हिडिओमध्ये त्याने प्रियकरानी अचानक आपली साथ सोडली त्यामुळे आपण हे पाऊल उचलले आहे माझ्या आत्महत्येस तोच जबाबदार आहे असे म्हणून त्यांनी आत्महत्या केली ही माहिती नातेवाईकांनी माध्यमाला दिली आहे.
नेमके काय आहे प्रकरण
मयत प्रकाश कोळी उर्फ स्वीटी यांचे सुजित आप्पासाहेब जमादार (रा.वैद्य वाडी सोलापूर )यांच्यासोबत मागील आठ वर्षापासून प्रेम संबंध होते, मात्र सुजित ने दुसऱ्या तरुणीशी लग्न करण्याचे ठरवले व त्याचे शुक्रवार दिनांक 5 रोजी लग्न होणार होते मात्र मयत प्रकाश कोळी उर्फ स्वीटी यांनी लग्नाच्या आदल्या दिवशीच प्रकाश कोळी उर्फ स्वीटी यांनी आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी स्वीटीने सुजित जमादारच माझ्या आत्महत्येस जबाबदार राहील असे व्हिडिओ रेकॉर्ड केली आहे.याप्रकरणी नागेश व्यंकप्पा कोळी (रा. विद्या नगर, शेळगी) याने फौजदार चावडी पोलिसांत फिर्याद दिली. त्यावरुन पोलिसांनी सुजित जमादार यास अटक केली. सहायक पोलिस निरीक्षक रोहन खंडागळे तपास करीत आहेत.
धोका सहन न झाल्याने टोकाचा निर्णय
संशयित आरोपी सुजितचे वय सध्या २३ असून त्याचे पाच वर्षांपासून प्रकाशसोबत (स्विटी) प्रेमसंबंध होते. काही महिन्यांपूर्वी दोघांनीही बाळे परिसरातील साईननगरात भाड्याने खोली केली होती. त्याच ठिकाणी ते काही महिने राहिले. अलीकडे सुजित त्याच्या घरी राहायला होता. स्विटी राहत असलेल्या घराचे भाडे सुजितच देत होता. पण, इतके वर्षे माझ्यासोबत प्रेमाचे नाटक करून राहिलेला सुजित दुसऱ्याच तरुणीशी विवाह करत असल्याने तृतीयपंथी प्रकाश मानसिकदृष्ट्या खचला होता. त्यातून त्याने व्हिडिओ तयार करून गुरुवारी (ता. ४) भाड्याच्या खोलीत गळफास घेतला.
आम्हाला न्याय द्या
प्रकाशचे एका तरुणाची आठ वर्षापासून प्रेम संबंध होते त्या तरुणाची लग्न ठरले होते आणि आज हळदीचा कार्यक्रम होता दरम्यान अनेक वर्षापासून प्रियकर प्रकाशला छळत होता त्याने प्रकाशची साथ अचानक सोडली होती आणि लग्नाचा निर्णय घेतला प्रियकरांनी दिलेल्या धक्का प्रकाशला सहन झाला नाही आणि त्यांनी आत्महत्या केली त्याची चौकशी करून आम्हाला न्याय मिळाला पाहिजे
ज्योती कोळी मयताची बहीण सोलापूर.

0 Comments