दुर्दैवी घटना : देवदर्शनाला निघालेल्या कार अपघातात चिमुकलीचा मृत्यू अक्कलकोट तालुक्यातील घटना
सोलापूर : देवदर्शनासाठी जात असताना एका तीन वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे या घटनेबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की दत्त जयंती निमित्त श्री क्षेञ गागणापूर दर्शनासाठी निघालेल्या कुटुंबाच्या चार चाकी वाहनाने अक्कलकोटच्या जवळपास मैंदर्गी बायपास रस्त्यावरील ब्रिजवर असलेल्या लोखंडी कठड्याला जोरदार धडकली यात तीन वर्षाची चिमुकली हिंदवी हिचा दुर्दैवी मृत्यू झाला.
हिंदवी सौदागर पवार वय (3) वर्षे (रा. कोंडी तालुका उत्तर सोलापूर )असे जागीच ठार झालेल्या चिमुकली मुलीचे नाव आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की श्री दत्त जयंती निमित्त पहाटे कोंडी सोलापूर येथून चिमुकलीचे वडील सौदागर पवार आई अंकिताचा पवार स्वतः हिंदवी वय 3 वर्षे व चुलत काका तथा चालक सहदेव चंद्रकांत पवारा हे सर्वजण गावातीलच सुशांत शिवाजी भोसले यांच्या मालकीची चार चाकी गाडी (mh13 एस 82 92 )पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास श्री क्षेत्र गागणापुर येथे दर्शनासाठी निघाले होते पवार कुटुंबातील सर्व सदस्यांनी गागणापुर जाताना अक्कलकोटून बायपास ने मैंदर्गी रस्त्यावरील(Akkalkot-maindargi Accident) ब्रिजवर आली असता वाहनाच्या चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने लोखंडी कठड्याला धडक दिली.
या अपघातात हिंदवी हिच्या डोक्यात जबर मार लागला होता डोळ्यासमोर चिमुकली हिंदवी तडफडत असतानाचे पाहून तिची आई अंकिताचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. तिला कुटुंबांनी भल्या पहाटे मिळेल त्या वाहनाने सोलापूर येथील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचाराठी दाखल केले. त्यांच्यावर उपचार चालू असताना हिंदवीची प्राणज्योत मालवली. या दुर्दैवी घटनेत चिमुकली ठार झाल्याने कोंडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत वडील सौदागर पवार यांनी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात चालकाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे .अधिक तपास पोलीस निरीक्षक दीपक भिताडे व पोलीस हेडकॉन्स्टेबल राजू कोळी हे करत आहेत करीत आहेत. अक्कलकोट- गागणापुर (Akkalokot-Gagnapur Road Accident) मार्गावर वारंवार अपघात होत आहेत त्यातच रस्त्याचे काम रखडलेली आहेत,याचा नागरिकांना आणि भक्तांना मोठा त्रास होत आहे .याप्रकरणी तात्काळ लक्ष घालून रस्त्याचे काम लवकरात लवकर करण्याची मागणी भाविकांसह नागरिकांतून होत आहे.

0 Comments