लातूर ब्रेकिंग - भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांना धक्का,अजित दादांच्या राष्ट्रवादीने चारली धूळ दणदणीत विजय; 23 जागे पैकी 17 जागेवर विजयी मोहर, भाजपला सहा जागेवर समाधान तर काँग्रेसचा दारुण पराभव
लातूर : निवडणुकीसाठी अभिमन्यू पवार यांनी संपूर्ण ताकद पणाला लावली होती. आमदार झाल्यापासून नगरपरिषदेची ही पहिलीच निवडणूक होती. त्यामुळे त्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील औसाचे आमदार अभिमन्यू पवार यांना धक्का बसला आहे. लातूर जिल्हातील महत्वाची नगरसेवक मानल्या जाणाऱ्या औसामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला धूळ चारली आहे. आजी-माजी आमदार पक्षात असूनही भाजपला नगरपरिषदेत कमळ फुलविता आले नाही.औसा नगरपरिषदेमध्ये नगराध्यक्षपदासह २३ जागांसाठी मतदान झाले होते. अभिमन्यू पवार हे २०१९ पासून या मतदारसंघाचे आमदार आहेत. तर त्याआधीच्या दोन टर्म बसवराज पाटील हे आमदार होते. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीआधीच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे औसामध्ये भाजपची ताकद वाढली होती.
भाजपसमोर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आव्हान होते. मात्र, आजच्या निकालामध्ये राष्ट्रवादीने पुन्हा एकहाती सत्ता काबीज करत गड राखला. नगराध्यक्षपदासह राष्ट्रवादीचे १७ उमेदवार विजयी झाले आहे. पवार आणि पाटील यांची जोडी भाजपला विजय मिळवून देऊ शकला नाही. भाजपच्या पारड्यात केवळ सहा जागा पडल्या आहेत. राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार परवीन नवाबोद्दीन शेख विजयी झाल्या आहेत. स्वत: अजित पवार यांनी त्यांच्यासाठी सभा घेतली होती.तर दुसरीकडे काँग्रेसला भोपळाही फोडता आला नसल्याचे चित्र आहे.
मागील निवडणुकीतही राष्ट्रवादीने विजय मिळविला होता. भाजपला मागच्या निवडणुकीतील सहा जागांचा आकडा यावेळी पार करता आलेला नाही. अभिमन्यू पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. त्यांनी या निवडणुकीसाठी संपूर्ण ताकद पणाला लावली होती. आमदार झाल्यापासून नगरपरिषदेची ही पहिलीच निवडणूक होती. त्यामुळे त्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.
लातूर ब्रेकिंग - भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांना धक्का
लातूर जिल्ह्यातील औसा नगर परिषद निवडणूक निकाल
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार परवीन शेख ६०० मतांनी विजयी
नगरसेवक पदाच्या १७ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट विजयी
६ जागांवर भाजप - शिवसेना शिंदे गट युती विजयी
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या समर्थकांचा जल्लोष... फटाके फोडून आणि गुलाल उधळून केला जल्लोष

0 Comments