राज्यातील सर्वात तरूण नगराध्यक्ष अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?-Mohol Nagarpalika Election Result

Hot Posts

6/recent/ticker-posts

राज्यातील सर्वात तरूण नगराध्यक्ष अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?-Mohol Nagarpalika Election Result

राज्यातील सर्वात तरूण नगराध्यक्ष

अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?-

सोलापुर प्रतिनिधी /रुपेश डोलारे:  जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. मोहोळ नगरपरिषदेच्या निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने भारतीय जनता पक्षाला भाजप जबरदस्त धक्का दिला आहे. शिवसेनेच्या उमेदवार सिद्धी वस्त्रे यांनी भाजपच्या उमेदवार शीतल क्षीरसागर यांचा पराभव करत नगराध्यक्ष पदावर आपले नाव कोरले. विशेष म्हणजे, सिद्धी वस्त्रे या केवळ २२ वर्षांच्या असून त्या राज्यातील सर्वात तरुण नगराध्यक्ष ठरल्या आहेत.

मोहोळमध्ये भाजपचे वर्चस्व राहिले असून माजी आमदार राजन पाटील यांची येथे मोठी ताकद आहे. मात्र, या निकालाने त्यांच्या नेतृत्वाला मोठे आव्हान मिळाले. शिवसेनेच्या सिद्धी वस्त्रे यांनी भाजपच्या शीतल क्षीरसागर यांचा १७० मतांच्या फरकाने पराभव केला. या निकालामुळे सोलापूर  जिल्ह्यातील भाजपच्या गोटात अस्वस्थता पसरली असून, आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेचा आत्मविश्वास वाढला आहे. तसेच नगरपरिषदेच्या एकूण २० जागांपैकी ९ जागांवर विजय मिळवत शिवसेनेने मोहोळमध्ये आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले.

विजयानंतर सिद्धी वस्त्रे यांची पहिली प्रतिक्रिया

विजयानंतर माध्यमांशी बोलताना नवनिर्वाचित नगराध्यक्ष सिद्धी वस्त्रे भावूक झाल्या होत्या. त्या म्हणाल्या की, "हा विजय म्हणजे जनतेने माझ्यावर दाखवलेला मोठा विश्वास आहे. निवडणूक काळात माझ्यावर आणि माझ्या वयावर अनेक टीका झाल्या. परंतु, आजच्या निकालाने त्या टीकेला चोख उत्तर दिले. आता केवळ शहराचा विकास आणि जनतेच्या समस्या सोडवणे हेच माझे एकमेव ध्येय असेल."

कर सल्लागारकडे काम करणारी सिद्धी झाली कमी वयाची नगराध्यक्ष

मोहोळच्या नगराध्यक्ष सिद्धी राजू वस्त्रे वय (२२) या जिल्ह्यातील सर्वात कमी वयाच्या नगराध्यक्ष ठरले आहेत नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरण्यापूर्वी त्या कर सल्लागाराकडे ७ हजार रुपये पगारावर ऑडिटचे काम करायच्या .आता त्यांना शहरातून समस्येची ऑडिट करण्याची संधी मिळाली आहे मोहोळचे नगराध्यक्ष पद अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव होते. या पदासाठी शिंदेच्या सिद्धी वस्त्रे आणि भाजपच्या शीतल क्षीरसागर यांच्यात मुख्य लढत झाली. यात वस्त्रे यांनी बाजी मारली त्यांच्या आजोबा विश्वनाथ वस्ञे मोहोळचे माजी सरपंच होते .सलग सहा वेळा ग्रामपंचायत सदस्य होते कुटुंबात राजकीय वारसा आहे .कुटुंबातील मुले राजकारणात सक्रिय आहेत नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर राजू वस्त्रे यांची मोठी मुलगी सिद्धी यांनी उमेदवारी निश्चित झाली त्या एम कॉम करीत आहेत. त्यासोबत त्या कर सल्लागाराकडे काम करीत होत्या निवडणुकीत मोठी चुरस पाहायला मिळाली बड्या नेत्यांनी ठिय्या मांडला होता त्यात वस्त्रे यांनी बाजी मारली.

जिल्ह्यात 30 ते 40 वयाच्या आतील नगराध्यक्ष

जिल्ह्यातील अकलूज नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष रेश्मा अडगळे अनगर नगराध्यक्षपदी प्राजक्ता पाटील अक्कलकोट नगरपालिकेचे नगराध्यक्ष मिलन कल्याण शेट्टी दुधनीचे नगराध्यक्ष प्रथमेश म्हेञे हे 30 ते 40 वयोगटातील उमेदवार निवडून आले आहेत.

Post a Comment

0 Comments