महावितरण मधील कर्मचाऱ्यांच्या बदलीसाठी 30 हजाराची लाच घेतल्याप्रकरणी तीन लाचखोर अधिकारी एसीबीच्या जाळ्यात; धाराशिव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई-(Anti Corruption Bureau Dharashiv)
धाराशिव/ प्रतिनिधी रुपेश डोलारे : इच्छित ठिकाणी पद स्थापना देण्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्याकडून 30 हजार रुपयाची लाच घेणाऱ्या महावितरणच्या उपव्यवस्थापकासह दोन लिपिकांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत अटक केली आहे. याप्रकरणी 26 सप्टेंबर रोजी तक्रार दाखल करण्यात आली होती तेव्हापासून या प्रकरणाची पाळत ठेवून पडताळणी करत खात्री पटल्यानंतर या तिन्ही अधिकारी कर्मचाऱ्यांना एसीबीने ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे महावितरण विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
या घटनेबाबत एसीबी कडून (ACB) मिळालेली अधिक माहिती अशी की महावितरण कार्यालयातील कार्यरत दोन कर्मचाऱ्यांनी त्यांच्या अडचणीच्या पार्श्वभूमीवर बदलीसाठी विनंती केली होती यानुसार इच्छित ठिकाणी बदली देण्यासाठी आरोपी उदय दत्तात्रय बारकुल वय (४१ वर्ष) (पद -निम्नसतर लिपिक उप कार्यकारी अभियंता कार्यालय महावितरण धाराशिव) ,भारत व्यंकटराव मेथेवाड वय (५०) वर्षे (पद- उपव्यवस्थापक मानव संसाधन विभागीय महावितरण कार्यालय धाराशिव) व शिवाजी सिद्राम दुधभाते वय ( 40 )वर्षे (पद उच्चस्तर लिपिक अधीक्षक अभियंता महावितरण मंडळ कार्यालय धाराशिव) या तिघांनी मिळून तक्रारदाराकडे 30 हजार रुपयाची लाचेची मागणी केली. त्यानुसार सदरील रक्कम त्यांच्याकडून स्वीकारूनही त्यांचे इच्छित ठिकाणी बदली केली नाही यातील आरोपी क्रमांक 2 श्री मेथेवाड यांनी आणखी 20 हजार रुपयांची लाचेची मागणी केली .याबाबत तक्रारदारांनी दिनांक 26 सप्टेंबर रोजी लाच लुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे तक्रार दाखल केली या तक्राराची एसीबीच्या अधिकाऱ्यांनी पंचामार्फत दिनांक 27 व 29 सप्टेंबर रोजी पडताळणी केली.
यामध्ये वरील तिन्ही आरोपींनी तक्रारदाराकडून 30 हजार रुपये स्वीकारल्याचे निष्पन्न झाले .तसेच सदरील रक्कम या तिन्ही आरोपींना आपापसात वाटून घेतल्याची ही पडताळणीत समोर आले आहे. दाखल केल्याची खात्री झाल्यानंतर एसीबीच्या पथकाने दिनांक 10 रोजी कारवाई करत वरील तीनही आरोपींना त्याच्या कार्यालयातून ताब्यात घेत त्याच्याविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. एकीकडे ही कारवाई सुरू असताना दुसऱ्या पथकाकडुन आरोपींच्या महात्मा गांधी नगर, शाहूनगर ,धाराशिव व लातूर येथील घरातील झडती सुरू करण्यात आली आहे .याप्रकरणी एसीबी चे पोलीस उपनिरीक्षक विजय वगरे यांनी तक्रार दिली असून त्यानुसार गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोपींचे मोबाईल ही पथकाने जप्ती केली असून त्याचेही तांत्रिक विश्लेषण अधिक माहिती काढली जाणार असल्याचे समजते ही कारवाई छत्रपती संभाजी नगर विभागाच्या पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे,योगेश वेळापूरे, पोलीस उप अधिक्षक ला. प्र. वि. धराशिव,योगेश वेळापूरे, पोलीस उप अधिक्षक ला. प्र. वि. धाराशिव,शशिकांत सिंगारे , अपर पोलीस अधीक्षक, पोनि वगरे, पोनि नरवटे, पो.हे.जाधव, पो. अ.तावस्कर, पो.अ . डोके, पो. अ. हजारे ला. प्र. वि. छत्रपती संभाजीनगर यांचा समावेश होता.
जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांचेकडे कोणत्याही शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी किंवा त्यांचे वतीने खाजगी इसम कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा.
भ्रष्टाचारा संबंधित काही तक्रार असल्यास
टोल फ्री क्र:- 1064
व्हॉट्सॲप क्र.9270231064
पोलीस उप अधीक्षक, ला. प्र. वि. धाराशिव

0 Comments