अणदूर येथे घरातील जंगम वस्तू जप्तीसाठी गेलेल्या सोसायटी कर्मचाऱ्यास धक्काबुक्की करून जीव मारण्याची धमकी; शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी दोन जनावर गुन्हा दाखल-Big Breaking News Andur

Hot Posts

6/recent/ticker-posts

अणदूर येथे घरातील जंगम वस्तू जप्तीसाठी गेलेल्या सोसायटी कर्मचाऱ्यास धक्काबुक्की करून जीव मारण्याची धमकी; शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी दोन जनावर गुन्हा दाखल-Big Breaking News Andur

अणदूर येथे घरातील जंगम वस्तू जप्तीसाठी गेलेल्या सोसायटी कर्मचाऱ्यास धक्काबुक्की करून जीव मारण्याची धमकी; शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी दोन जनावर गुन्हा दाखल-


धाराशिव  : तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे घरातील जंगम वस्तू जप्ती करण्यासाठी गेलेल्या रूपामाता अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या कर्मचाऱ्यास धक्काबुक्की करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना दिनांक 12 रोजी घडली. याप्रकरणी दोन जणांवर शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी नळदुर्ग पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेबाबत पोलिसांनी मिळालेली अधिक माहिती अशी की ,आरोपी  नामे- शिवाजी रतु जाधव, महेश शिवाजी जाधव दोघ रा. अणदुर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.12.12.2025 रोजी 11.30 वा. सु. अणदुर येथे फिर्यादी नामे-सतिश भानुदासराव खंडके, वय 53 वर्षे, रा. गोरोबा काका नगर सांजा रेाड धाराशिव ता.जि. धाराशिव हे व  रुपामाता अर्बन को. सोसायटी चे कर्मचारी हे मा.न्यायाधिश वरिष्‌ठ स्तर तुळजापूर आदेशाने विशेष दरखास्त मधील  प्रतिवादीचे घरातील जंगम वस्तु जप्त करण्यासाठी गेले असता नमुद आरोपीतांनी संगणमताने फिर्यादी हे शासकीय काम करीत असताना शिवीगाळ करुन धक्काबुक्की करुन जिवे मारण्याची धमकी देवून शाकीय कामात अडथळा निर्माण केला.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-सतिश खांडके यांनी दि.12.12.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पो ठाणे नळदुर्ग येथे भा.न्या.सं.कलम 132, 115(2), 352, 351(2), 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.       

Post a Comment

0 Comments