परंडा : कुत्र्याने चप्पल घेऊन गेल्याच्या कारणावरून एका महिलेस कोयत्याने मारहाण, चार जणांवर गुन्हा दाखल परंडा तालुक्यातील घटना-Braeking News Dharashiv District

Hot Posts

6/recent/ticker-posts

परंडा : कुत्र्याने चप्पल घेऊन गेल्याच्या कारणावरून एका महिलेस कोयत्याने मारहाण, चार जणांवर गुन्हा दाखल परंडा तालुक्यातील घटना-Braeking News Dharashiv District

परंडा : कुत्र्याने चप्पल घेऊन गेल्याच्या कारणावरून एका महिलेस कोयत्याने मारहाण, चार जणांवर गुन्हा दाखल परंडा तालुक्यातील घटना-


धाराशिव : कुत्र्याने चप्पल घेऊन गेल्याच्या किरकोळ कारणावरून एका महिलेस चार जणांनी संगनमताने मिळून शिवीगाळ करत लाथा बुक्क्या व कोयत्याने मारहाण करून  गंभीर जखमी केल्याची घटना परंडा तालुक्यातील धोत्रा येथे घडली या प्रकरणी फिर्यादी रेश्मा बिरुदेव माशाळे यांच्या फिर्यादीवरून परंडा पोलीस ठाण्यामध्ये(Paranda Police station)  चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेबाबत पोलिसाकडून मिळालेली अधिक माहिती अशी की ,आरोपी  नामे- शंकर पागरु मासाळ, वय 60 वर्षे, राहुल शंकर मासाळ, वय 30 वर्षे, सगजान शंकर मासाळ, वय 50 वर्षे, दिपाली राहुल मासाळ, वय 25 वर्षे, सर्व रा. मासाळ वस्ती भोत्रा ता. परंडा जि. धाराशिव यांनी दि.12.12.2025 रोजी 06.00 वा. सु. मासाळ वस्ती भोत्रा येथे फिर्यादी नामे-रेश्मा बिरुदेव मासाळ, वय 29 वर्षे, रा. मासाळ वस्ती भोत्रा ता. परंडा जि. धाराशिव यांना आरोपींनी कुत्र्याने चप्पल घेवून गेल्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी कोयत्याने मारहाण करुन गंभीर जखमी केले. फिर्यादी व त्यांचे पती यांना जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-रेश्मा मासाळ यांनी दि.12.12.2025रोजी दिलेल्या वैद्यकीय जबाबावरुन पो ठाणे परंडा येथे भा.न्या.सं.कलम(Bhartiya Nyay Sanhita)  118(2), 115(2), 352, 351(2), 3(5) सह 4,25 आर्म ॲक्ट अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या घटनेचा अधिक तपास परंडा पोलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments