मौजे केरुर येथील अनुश्री पवार हीचे जी .एन. एम. परिक्षेत उज्वल यश.

Hot Posts

6/recent/ticker-posts

मौजे केरुर येथील अनुश्री पवार हीचे जी .एन. एम. परिक्षेत उज्वल यश.

 मौजे केरुर येथील अनुश्री पवार हीचे जी .एन. एम. परिक्षेत उज्वल यश.


----------------------------------------

शंभूराजे बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने करण्यात आला सन्मान.

----------------------------------------

इटकळ (दिनेश सलगरे):- तुळजापूर तालुक्यातील मौजे केरुर येथील अनुश्री रोहिदास पवार हीने जी.एन. एम.परिक्षेत घवघवीत यश संपादन केल्याबद्दल शंभुराजे बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने केरुर येथे अनुश्री पवार हीचा यथोचित सन्मान करण्यात आला

पारधी समाजावर चोरीचा,व दरोडा व गुन्हेगारीचा कलंक असतानाही घरात बसुन राहण्यापेक्षा शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, शिक्षणाशिवाय प्रगती व विकास नाही म्हणून अनुश्री रोहिदास पवार हीने आपले बारावी पर्यंतचे शिक्षण नांदेड जिल्ह्यामध्ये घेतले असुन तिचा विवाह तुळजापूर तालुक्यातील केरुर येथील सुशिक्षित प्रदिप पंडीतराव भोसले यांच्यासोबत झाला आहे.गुन्हेगारीचा कलंक कपाळी असला तरीही आपण पुढील शिक्षण घ्यायचे म्हणून धाराशिव येथील शासकीय परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालय जिल्हा रुग्णालय येथे आपले जि एन एम चे शिक्षण पुर्ण करुन विशेष गुणवत्ता यादीत येवून यश संपादन केले आहे त्यानिमित्त इटकळ येथील शंभुराजे बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने अनुश्री पवार हीचा यथोचित सत्कार करण्यात आला 

यावेळी संस्थेचे संस्थापक दिनेश सलगरे, बालकल्याण समितीचे सदस्य तथा पत्रकार दयानंद काळुंके, उद्योजक नामदेव गायकवाड,केशव गायकवाड,हभप बाळु सुरवसे,पंडीतराव भोसले, सुनिता भोसले, प्रदिप भोसले, कुंदन भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती 

जि एन एम परिक्षेत घवघवीत यश संपादन केल्याबद्दल सर्वत्र तिचे कौतुक व अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments