बसच्या धडकेत नांदुरी येथील महिला ठार; तामलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल-Bus Accident Tamalwadi Police Station Crime News

Hot Posts

6/recent/ticker-posts

बसच्या धडकेत नांदुरी येथील महिला ठार; तामलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल-Bus Accident Tamalwadi Police Station Crime News

बसच्या धडकेत नांदुरी येथील महिला ठार; तामलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल-


धाराशिव /प्रतिनिधी रूपेश डोलारे : तुळजापूर तालुक्यातील नांदुरी येथील महिला सिंधुबाई मधुकर गाडे यांचा पायी जात असताना बसच्या धडकेत महिला ठार झाल्याची घटना दि,२रोजी घडली. याप्रकरणी तामलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेबाबत पोलिसाकडून मिळालेली अधिक माहिती अशी की,  मयत नामे-सिंधुबाई मधुकर गाडे, वय 55 वर्षे, रा. नांदुरी ता. तुळजापूर जि. धाराशिव दि.02.12.2025 रोजी 20.45 वा. सु. हॉटेल शंभुराजे समोरील रोडवरुन नांदुरी येथुन पायी जात होत्या. दरम्यान बस क्र एमएच 40 एन 9672 चा चालक आरोपी नामे- गणेश पांडुरंग गंधोरे, रा. एसटी आगार तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव यानी त्याचे ताब्यातील बस ही हायगयी व निष्काळजीपणे चालवून सिंधुबाई गाडे यांना पाठीमागून धडक दिली. या अपघातात सिंधुबाई गाडे या गंभीर जखमी होवून मयत झाल्या. फिर्यादी नामे-प्रशांत मधुकर गाडे, वय 35 वर्षे, रा.नांदुरी ता.तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.03.12.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तामलवाडी पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम  106(1) सह 184 मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Post a Comment

0 Comments