तुळजापूर नगर परिषद निवडणुकीत 80 टक्के मतदान आ.राणाजगजितसिंह पाटील निरीक्षणात, गंगणे आघाडीवर? मतदानानंतर राजकीय गणिते बदलली
तुळजापूर : नगरपरिषद निवडणुकीत तब्बल ८० टक्के मतदान होऊन शहरातील राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे. मतदारांच्या अभूतपूर्व उत्साहामुळे निकाल कोणाच्या बाजूने झुकणार, जनतेचा कौल कोणाला मिळणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
मतदान संपताच तुळजापूर तालुक्याचे आमदार व माजी राज्यमंत्री राणाजगजितसिंह पाटील यांनी विविध मतदान केंद्रांना भेट देत परिस्थितीची पाहणी केली. मतदारांनी शांततेत व मोठ्या संख्येने मतदान केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
दरम्यान, नगराध्यक्ष पदाचे भारतीय जनता पार्टीकडून उमेदवार विनोद उर्फे पिटू गंगणे यांच्या प्रचाराला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद मतदानातही दिसून आला. विकासाभिमुख धोरणे आणि सर्वसमावेशक नेतृत्व या गंगणे यांच्या निवडणूक मुद्द्यांना नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.
यावेळी नगराध्यक्षचे उमेदवार श्री विनोद पिटू भैया गंगणे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार औदुंबर कदम दिनेश शिरसागर लखन पेंदे जिजामाता प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष मधुकर शेळके भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष शांताराम पेंदे आदी उपस्थित होते.

0 Comments