खळबळजनक : कला केंद्रातील नर्तिकेच्या प्रेम संबंधाच्या वादातून तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या, धाराशिव जिल्ह्यातील घटना-Dharashiv Kalakendra Young Suicide News

Hot Posts

6/recent/ticker-posts

खळबळजनक : कला केंद्रातील नर्तिकेच्या प्रेम संबंधाच्या वादातून तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या, धाराशिव जिल्ह्यातील घटना-Dharashiv Kalakendra Young Suicide News

खळबळजनक : कला केंद्रातील नर्तिकेच्या प्रेम संबंधाच्या वादातून तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या, धाराशिव जिल्ह्यातील घटना-



धाराशिव : जिल्ह्यातून एक मोठी खळबळ जनक अपडेट घटना समोर आली आहे, कला केंद्रातील एका नर्तिकेशी असलेल्या प्रेम संबंधाच्या वादातून एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना (incident)घडली आहे. बीड जिल्ह्यातील उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरण ताजे असतानाच या  खळबळ जनक घटनेने पुन्हा एकदा धाराशिव जिल्ह्यातील कला केंद्र वादाच्या भौऱ्यात सापडली आहेत.

 या घटनेबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, धाराशिव जिल्ह्यातील (Dharashiv)चोराखळी परिसरात प्रेमसंबंधातील वादातून एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून, पोलिसांनी संबंधित नर्तिका महिलेवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. विशेष म्हणजे आत्महत्या(Suicide)  केलेला तरुण हा विवाहित आहे.मयत तरुणाचे नाव आश्रुबा अंकुश कांबळे (वय 39, रा. रुई ढोकी ता.जि.धाराशिव ) असे असून, तो गेल्या पाच वर्षांपासून धाराशिवमधील साई कला केंद्रात (Sai kala kendra) नृत्यसंबंधित काम करणाऱ्या एका विवाहित महिलेसोबत प्रेमसंबंधात असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.मंगळवारी आश्रुबा आणि महिला शिखर शिंगणापूर(Shikharsinganapur)येथे देवदर्शनासाठी गेले होते. देवदर्शनावरून परतत असताना तरुणाच्या पत्नीचा फोन आला. या फोनवरुन दोघांमध्ये तीव्र वाद झाला. संतापाच्या भरात आश्रुबाने "आत्महत्या करतो" अशी धमकी दिली. मात्र, महिलेने त्याकडे लक्ष दिले नाही. अखेर त्याने संतापाच्या भरात अश्रुबाने टोकाचं पाऊल उचललं.वादानंतर आश्रुबा थेट चोराखळी परिसरात आला आणि झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. स्थानिकांनी याची माहिती तात्काळ येरमाळा (Yermala)पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा(Panchnama) केला, शवविच्छेदनासाठी पाठवले आणि नंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.या संपूर्ण घटनेत महिलेची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे. पोलिसांनी तिलाही चौकशीसाठी(Police Investigation) ताब्यात घेतले आहे. येरमाळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

धाराशिव जिल्ह्यातील कला केंद्र कायम वादाच्या भोवऱ्यात

मागील चार महिन्यापूर्वी  चोराखळी येथील महाकाली लोकनाट्य कला केंद्रात दोन गटात वाद होऊन गोळीबार झाला होता तसेच महाकाली कला केंद्रातील सरोज चिकुंद्रे ,रेणू पवार आणि नीता जाधव या तीन नर्तिकेवर उमरगा येथील अभिषेक कालिदास शिंदे यांच्या खून प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे माजी उपसरपंच बर्गे यांची आत्महत्या प्रकरणात पिंपळगावच्या पूजा गायकवाड या नर्तिकेवर गुन्हा नोंद होऊन तिला अटक झाली. काही कला केंद्र नाच गाण्यावरून दोन गटात वेधून जाणारी च्या घटनेची नोंद पोलीस तप्तरी आहे काही ठिकाणी तर ग्राहकाकडूनच नर्तिकांना मारहाण व इतर त्रास दिला गेल्यानंतर ही व्यवसाय व दबावामुळे प्रकरण दडपली जात असल्याचे बोलले जात आहे. त्यातच आता धाराशिव जिल्ह्यातील चोराखळी येथील साई कला केंद्र तील नर्तिकीच्या प्रेम संबंधातून एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या घटनेमुळे कला केंद्र मालकासह परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे.


Post a Comment

0 Comments