मौजे इटकळ येथील उबाठा गटाचे येवती गट प्रमुख बाळासाहेब वाघमारे यांचा भाजपा मध्ये प्रवेश-Itakal BJP News

Hot Posts

6/recent/ticker-posts

मौजे इटकळ येथील उबाठा गटाचे येवती गट प्रमुख बाळासाहेब वाघमारे यांचा भाजपा मध्ये प्रवेश-Itakal BJP News

मौजे इटकळ येथील उबाठा गटाचे येवती गट प्रमुख बाळासाहेब वाघमारे यांचा भाजपा मध्ये प्रवेश- 


"""""""""""""""""""""""""""""""""""""""""

आ. राणा जगजितसिंहजी पाटील यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांसह बाळासाहेब वाघमारे भाजपा मध्ये.

"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""

इटकळ (दिनेश सलगरे):- उभाठा चे येवती गट प्रमुख बाळासाहेब वाघमारे यांनी आ.राणा जगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत भाजपा मध्ये केला प्रवेश. मौजे इटकळ येथील रहिवाशी उभाठा चे येवती गट प्रमुख बाळासाहेब वाघमारे यांनी आ.राणा जगजितसिंह पाटील यांच्या कर्तुत्वावर व त्यांच्या कार्यावर विश्वास ठेवत आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपा मध्ये प्रवेश केला असल्याने शहापूर गटात उभाठा शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. बाळासाहेब वाघमारे यांनी आपल्या सामाजिक कार्यातून तरुणांचे मोठे संघटन केलेले आहे त्यांनी यापूर्वी पंचायत समिती येवती व जिल्हा परिषद शहापूर गटातून निवडणूक लढवली आहे अगदी निसटत्या पराभवास त्यांना सामोरे जावे लागले तरी पण त्यांनी हार न मानता नव्या उमदीने सामाजिक कार्य करीत जिल्हा परिषद शहापूर गटात दांडगा जनसंपर्क निर्माण केला. बाळासाहेब वाघमारे यांचे युवक संघटन खूप मोठे असून त्यांनी तुळजापुर तालुक्याचे कर्तव्यदक्ष व कार्यतत्पर आ. राणा जगजितसिंह पाटील यांच्या कर्तत्वावर विश्वास ठेवत नुकताच भाजपा मध्ये प्रवेश केला असल्याने शहापूर जिल्हा परिषद गटात भाजपा चे पारडे जड झाले आहे आगामी जिल्हा परिषद शहापूर गट हा एस.स.पुरुषासाठी राखीव आहे असून बाळासाहेब वाघमारे यांना भाजपा पक्षाने उमेदवारी दिली तर निश्चितच या शहापूर जिल्हा परिषद गटात भाजपा विजयी होईल असे तरुण मतदारातून भावना व्यक्त केल्या जात आहेत. बाळासाहेब वाघमारे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, भाजपा पक्षाने जर शहापूर जिल्हा परिषद गटात उमेदवारी दिली तर सर्व ताकदीनिशी निवडणूक लढवणार व विजय संपादन करणार असे प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. बाळासाहेब वाघमारे यांच्या सोबत निलेगाव येथील माजी सरपंच नुरखा सौदागर, महेबुब शेख, अली अब्बास शेखदार, विठ्ठल घंटे, इस्माईल कुरणे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपा मध्ये प्रवेश केला. यावेळी कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती आशिष सोनटक्के, युवक भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रतीक रोचकरी,भाजपा गट प्रमुख मल्लिनाथ गावडे, भाजपा जिल्हा सरचिटणीस अरविंद पाटील, तालुका सरचिटणीस पद्माकर जेवळे,उपसरपंच फिरोज मुजावर, हुसेन मकानदार,बाळासाहेब वाघमारे यांनी भाजपा मध्ये प्रवेश केल्याने गाव परिसरातून त्यांचे अभिनंदन करीत कौतुक केले जात आहे.

Post a Comment

0 Comments