एकतर्फी प्रेमातून लग्नास नकार देणाऱ्या युवतीचा खून; आरोपी तरुणास जन्मठेपेची शिक्षा सोलापूर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल-one-sided love; Accused youth sentenced to life imprisonment, Solapur Chief District and Sessions Court verdict-

Hot Posts

6/recent/ticker-posts

एकतर्फी प्रेमातून लग्नास नकार देणाऱ्या युवतीचा खून; आरोपी तरुणास जन्मठेपेची शिक्षा सोलापूर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल-one-sided love; Accused youth sentenced to life imprisonment, Solapur Chief District and Sessions Court verdict-

एकतर्फी प्रेमातून लग्नास नकार देणाऱ्या युवतीचा खून; आरोपी तरुणास जन्मठेपेची शिक्षा सोलापूर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल-


सोलापूर : एकतर्फी प्रेमातून लग्नास नकार देणारे युतीचा खून करणारे आरोपी सोलापूर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोकवली आहे ज्योतिबा अशोक गायकवाड वय 35 (राहणार विक्रांत नगर अक्कलकोट रोड सोलापूर) येथे आरोपीचे नाव आहे.

याबाबत घटनेची थोडक्यात  हकीगत अशी की , फिर्यादी श्रुतीका लक्ष्मण कुसेकर (रा. मलिकार्जुन नगर अक्कलकोट रोड सोलापूर)व आरोपी एकमेकाची नातेवाईक आहेत घटने पूर्वी तीन महिने अगोदर फिर्यादीची चुलत आत्या प्रतिभा व त्याचा मुलगा ज्योतिबा फिर्यादीच्या घरी आले होते .मयत सुनीता ही फिर्यादी श्रुतीका  यांची लहान बहिण आहे .ज्योतिबा यांनी सुनिता हीच लग्नाची मागणी केली होती यावेळी फिर्यादीच्या आईने मयत मुलगी सुनिता अज्ञान आहे असे म्हणून लग्नास नकार दिला. फिर्यादी यांच्या वडिलांचे 2008 रोजी निधन झाले होते;घटनेच्या वेळी मयत सुनिता कनिष्ठ महाविद्यालय शिक्षण घेत होती घटनेच्या दिवशी 8 फेब्रुवारी 2021 रोजी सुनीता घरातून क्लास साठी कन्ना चौक येथे गेली होती. परंतु ती रात्री उशिरापर्यंत घरी आली नव्हती चौकशी केली असता मैत्रिण निकिता हिने सांगितले की सायंकाळी 5 च्या सुमारास ज्योतिबा हा मोटरसायकलून आला व तिला घरी घेऊन गेला दरम्यान सुनीता हिला मोबाईल वरून फोन लावला  असता ती उचलत नव्हती ज्योतिबा यास फोन केला असता त्यांनी सांगितले की सुनीता ही बेशुद्ध झाली आहे व तिला मार्कंडे रुग्णालयात आणले आहे.

 फिर्यादी श्रुतीका व तिची आई साक्षीदार कांचन कुशीकर हे रुग्णालयात गेली असता आरोपी हा तेथे होता व उपचारासाठी पैसे आणतो असे म्हणून निघून गेला तो परत आलाच नाही रुग्णालयामध्ये सुनीता हिला आरोपीने मयत अवस्थेत आणले होते सुनीताच्या गळ्यावर,पायावर ,हनवटीवर जखमा झालेल्या होत्या. आरोपीने मेहता रुग्णालयात आणल्याची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली होती. त्या घटनेपासून ज्योतिबा फरार होता सुनीताचा मृत्यू गळा दाबून झालेला आहे.असा मृत्यू  अहवाल  आल्याने मयताचा खून आरोपी ज्योतिबा यांनीच केल्याची फिर्याद दाखल केली गेली .

या घटनेचा तपास एमआयडीसी पोलीस ठाण्याची तत्कालीन पोलीस निरीक्षक विश्वनाथ सिद्ध यांनी केला आरोपीस अटक केल्यानंतर त्यांनी या गुन्ह्यासाठी दोरीचा उपयोग केल्याचे सांगितले सरकार पक्षातर्फे 24 साक्षीदार एडवोकेट आनंद कुरुडकर यांच्यामार्फत नोंदविण्यात आले. त्यात मैत्रीण बिनमुंडी ही एकमेव साक्षीदार ठरली तिने आरोपी ज्योतिबा व मुंबईत सुनीता या दोघांना जीवंतपणी पाहिल्याची साक्षीदार  होती. तिचा जबाब महत्त्वाचा ठरला सोमवारी दि,२ रोजी  शिक्षेबाबत अभियोग पक्ष मूळ फिर्यादी व बचाव पक्षाच्या युक्तिवाद झाला प्रमुख व जिल्हा सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांनी आरोपीस जन्मठेप  व 50 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली  या सरकार पक्षातर्फे Adv. आनंद कुरुडकर बचाव पक्षातर्फे adv. इनामदार फिर्यादीतर्फे adv. सरवदे Adv. भंडारी यांनी तर कोर्ट पैरवी  अधिकारी म्हणून पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण जाधव यांनी काम पाहिले.

Post a Comment

0 Comments