सावधान : बीड- तुळजापूर महामार्गावर चोरट्यांचा नवा फंडा नागरिकांनो सतर्क रहा रात्री निर्मनुष्य रस्त्यावर थांबू नका!-
धाराशिव : धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करताना नागरिकांना अधिक सजग आणि सतर्क राहणे आवश्यक आहे. मागील काही आठवड्यापासून या महामार्गावर चोरी ,लूटमार, दरोडे आणि संशयास्पद हालचालींच्या घटना वाढल्या आहेत मध्यंतरी तुळजापूर येथे दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या बाबतीतील लुटमारीच्या घटना घडलेली असतानाच आता या महामार्गावरील 10 महत्त्वाच्या ठिकाणांना(Hotspot) पोलीस प्रशासनाकडून (Police Department) अत्यंत धोकादायक झोन म्हणून चिन्हांकीत करण्यात आले आहे.
बीड ते तुळजापूर(Beed -Tuljapur National Highay) या राष्ट्रीय महामार्ग 52 वर प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. पोलीस यंत्रणेने या महामार्गावर मागील काही आठवड्यापासून घटनांच्या नोंदी घेत दरोडेखोर आणि चोरट्यांचा प्रवाशाकडील किमती ऐवज लुटण्याच्या नव्या कारनाम्यांचा उलगडा केला आहे .तसेच या महामार्गावरून प्रवास करताना प्रवाशांनी प्रवास करताना आवश्यक ती काळजी घ्यावी असे आव्हान बीड पोलीस प्रशासनान आणि महामार्ग सुरक्षा पथकाकडून करण्यात आले आहे .प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी बीड पोलिसांनी (Beed Police)सात रस्ते आव्हाने महामार्गावर तैनात केली आहेत तसेच विशेष रात्री गस्त वाढविण्यात आले आहे.
आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदत मिळावी म्हणून नागरिकांना डायल 112 वर कॉल करण्याचा सल्ला देण्यात आला आहे .तसेच पोलीस निरीक्षक शंकर शिंदे वाशी, पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी नेकनुर, साहेब पोलीस निरीक्षक भालेराव येरमाळा ,आणि सहाय्यक निरीक्षक बाळराजे दराडे बीड ग्रामीण यांचे संपर्क क्रमांक ही जारी करण्यात आले आहेत.
अशी घ्यावी प्रवासी नागरिकांनी काळजी
वाहन चालवताना दुभाजकाला खेटून जाणे टाळावे कारण झाडाचे आडून गुन्हेगार सहजपणे झेप घेऊ शकतात, महामार्गावर कोणतेही संशयस्पद अडथळे जशी दगड लाकूड किंवा कृत्रिम गतिरोधक दिसल्यास थांबवण्याऐवजी पुढे निघून जाण्याची निर्देश दिले आहेत कुठेही असुरक्षित वाटल्यास जवळच्या हॉटेल पेट्रोल पंप किंवा वरळीच्या ठिकाणी असते घ्यावा धोकादायक ठिकाणी अनावश्यक पणे वाहन थांबवणे विशेषता रात्रीच्या वेळी एकटे प्रवास टाळावा आणि शक्य असल्यास प्रवासी समुहानेच प्रवास करावा.
या महामार्गावरील धोकादायक ठिकाणी
मांजरसुंबा घाट ,चौसाळा बायपास, पारगाव बायपास, सरमकुंडी फाटा, इंदापूर फाटा ,पारधी फाटा, घुले माळ जवळील उड्डाणपूल तेरखेडा ते येडशी टोलनाका परिसर येडशी बायपास आणि धारासिटी तुळजापूर या ठिकाणी रात्रीच्या वेळी परिस्थिती अतिशय बिकट असते कमी वर्दळ अंधार दुभाजकावर उगवलेले झुडपे आणि झाडी यामुळे दरोडेखोरांना लपून बसणे आणि अचानक हल्ला करणे सोपे जाते गुन्हेगार टोळ्या रस्त्याचा वापर लुटमारीसाठी करत आहेत या साऱ्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अत्यंत जागृत राहणे गरजेचे असल्याने पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
महामार्गावर प्रवास करणाऱ्या प्रत्येक नागरिकांनी स्वतःचे व आपल्या सहप्रवाशाची सुरक्षा सर्वात प्रथम ठेवणे आवश्यक आहे महामार्गावर रात्रीच्या वेळी प्रवासादरम्यान सावधगिरी आणि सजगता बागळगायला हवी
बाळराजे दराडे सहाय्यक पोलीस निरीक्षक (बीड ग्रामीण पोलीस ठाणे.)
पोलीस प्रशासनाच्या निरीक्षणातून पुढे आलेल्या गंभीर बाबी
- चोरट्यांची लुटमार करण्याची पद्धत ही दिवसेंदिवस अधिक धोकादायक होत चालली आहे पोलीस तंत्रज्ञाने या लुटमारीच्या प्रकाराची निरीक्षण करून सापळे रचित कारवाई सुरू केले आहेत
- काही गावठी टोळ्या महामार्गावर धावत्या वाहनासमोर अचानक जॅक, दगड किंवा खेळणी भरलेली लाकडी ओंडकी फेकून कृत्रिम अपघात घडवतात आणि मदतीच्या नावाखाली प्रवाशावर हल्ला करतात
- काही ठिकाणी ठिबक पाइपाच्या बंडलाने गतिरोधकांसारखा अडथळा तयार करून वाहने थांबवली जाते आणि पूर्वनियोजित टोळी झुडपातून बाहेर येत हल्ला करते त्याहून धोकादायक म्हणजे काही हल्लेखोर शस्त्राचा धाक दाखवून वाहन चालकांना पूर्णपणे असाह्य करतात
- दुचाकी स्वरांनी तर विशेष काळजी घ्यावी चोरटी दुचाकीला धक्का देणे किंवा मागे बसलेल्या प्रवाशाला ओढून खाली पडणे तसेच पाठलाग करून करणे अशा पद्धतीने लुटमार होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी निरीक्षण पोलिसांनी नोंदवली आहे
- रात्रीच्या वेळी महामार्गावर अनेक ट्रकचालक हॉटेल किंवा पेट्रोल पंपावर गाडी उभे करतात या वेळेत गुन्हेगार त्यांच्या टाक्यामधून डिझेल चोरी करणे तसेच एकटी असलेल्या चालकांना धमकावणे अशा घटना वारंवार घडत आहेत
- पोलिसांच्या मते महामार्गावर थांबलेल्या मालवाहतूक वाहनांची स्थिती बिकट आहे काही घटनांमध्ये प्रवासी वाहनावर दुभाजकाजवळून हल्ला करण्यात आला असून हल्लेखोर झुडपामध्ये आधीच लपून बसलेले असतात.

0 Comments