परंडा : कत्तलीसाठी नेत असलेल्या जर्सी गाई व वासरांची वाहतूक करणारा पिकप टेम्पो पोलिसांनी पकडला, एका आरोपीवर गुन्हा दाखल -Paranda Police Station Crime News

Hot Posts

6/recent/ticker-posts

परंडा : कत्तलीसाठी नेत असलेल्या जर्सी गाई व वासरांची वाहतूक करणारा पिकप टेम्पो पोलिसांनी पकडला, एका आरोपीवर गुन्हा दाखल -Paranda Police Station Crime News

परंडा : कत्तलीसाठी नेत असलेल्या जर्सी गाई व वासरांची वाहतूक करणारा पिकप टेम्पो पोलिसांनी पकडला, एका आरोपीवर गुन्हा दाखल -


धाराशिव : परंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोवंशिय प्राण्याची निर्दयपणे आणि बेकायदेशीरपणे वाहतूक करणाऱ्या एका आरोपीला रंगेहात  पोलिसांनी पकडले असून त्याच्याविरुद्ध विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना कुर्डूवडी रोडवर दिनांक 6 रोजी रात्री 10 वाजता जिकरे यांच्या पडीक जमिनी जवळ उघडकीस आली.


या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, आरोपी नामे- गौस अब्बास कुरेशी वय 27 वर्षे, रा. देवगाव रोड परंडा ता. परंडा जि.धाराशिव यांनी दि.06.12.2025 रोजी 21.50 वा. सु.जिकिरे यांचे पडीक जमीनीमध्ये कुर्डुवाडी रोड येथे पिकअप विना नंबर मध्ये गोवंशीय जातीचे 2 वासरे व 1 जर्सी गाय वाहनासह एकुण 2,35,000₹ किंमतीचे गोवंशीय जातीचे वासरे व गायी चे चारा पाण्याची व्यवस्था न करता निर्दयतेने कत्तलीसाठी बेकायदेशीर रित्या वाहतुक करत असताना परंडा पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे नमूद व्यक्तींविरुध्द प्राण्यास क्रुरतेने वागण्यास प्रतिबंध अधिनियम कलम 11(1),11(1)(ए),11 (1) (एफ), 11(1)(एच), 11(1) (आय) सह कलम 5(अ),5(बी), 9(ब), 11 महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम सह प्राण्याचे परिवहन नियम कलम 47,54,56 अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या घटनेचा अधिक तपास परंडा पोलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments