धक्कादायक! दहावीच्या विद्यार्थ्याचा कोचिंग क्लासमध्ये वर्गमित्राने केला चाकूने भोसकून खून; अल्पवयीन आरोपी विद्यार्थी स्वतःहून पोलिस ठाण्यात पुण्यातील राजगुरुनगर येथील घटना-
पुणे : खेड तालुक्यातील राजगुरुनगर येथे धक्कादायक घटना घडली असून कोचिंग क्लास मध्ये शिकणारे अल्पवयीन विद्यार्थ्यांचा वर्गातीलच अल्पवयीन मुलाने चाकूने वार करून खून केल्याची धक्कादाय घटना समोर आली आहे. याप्रकरणी खेड पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल केला असून त्याला बाल सुधार गृहात रवानगी केली आहे. याप्रकरणी जयश्री गणेश साबळे यांनी फिर्यादी दिली आहे .सोमवारी दि,15रोजी सकाळी 8:55 वाजता राजगुरुनगर गावच्या हद्दीतील खंडोबा माळ येथील सोनतारा बिल्डिंग समोर असलेल्या संस्कार कोचिंग क्लासेस मध्ये ही घटना घडली. पुष्कर दिलीप शिंगाडे असे मयत मुलाचे नाव आहे.
या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, अल्पवयीन आरोपीने दोन दिवसापूर्वी म्हणजे 13 डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या भांडणाचा राग मनात भरून सोमवारी वर्गातच पुष्कर दिलीप शिंगाडे वय (16) रा. सह्याद्री सोसायटी वाडा रोड तालुका खेड) यांच्यावर चाकूने हल्ला केला यात तो गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. आरोपीने पुष्करच्या गळ्यावर पोटावर तसेच शरीराच्या इतर भागावर चाकूने वार करून त्याला गंभीर जखमी केली होते उपचारापूर्वीच पुष्करचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पालकांमध्ये कितीचे वातावरण निर्माण झाले आहे या घटनेमुळे खाजगी कोचिंग क्लासेस मध्ये सुरक्षितेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
खाजगी कोचिंग क्लासेस मधील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
या घटनेमुळे कोचिंग क्लासमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शिक्षक वर्गात उपस्थित असतानाही इतक्या लहान वयाच्या मुलांनी चाकू बाळगणे आणि इतका गंभीर गुन्हा करणे, यावर पालकांनी आणि प्रशासनाने चिंता व्यक्त केली आहे. क्लास घेणाऱ्या संस्थेच्या सुरक्षिततेबद्दल आणि मुलांवर लक्ष ठेवण्याबद्दल प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.खासगी क्लासच्या व्यवस्थापनाकडून सुरक्षेच्या उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

0 Comments