थरारक घटना : पूर्ववैमनस्यातून मित्रानेच केला मित्राचा खून ; घटनेनंतर अपघाताचा बनाव पुरावा नष्ट करण्यासाठी रस्त्यावरील सांडलेले रक्त धुण्याचा प्रयत्न धाराशिव जिल्ह्यातील थरारक घटना-
धाराशिव : मागील भांडणाच्या वादातून मित्राचा जड वस्तूने ठेचून खून करून अपघाताचा बनाव केला ही थरारक घटना धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील कंडारी सोनारी रस्त्यावर सोमवारी दिनांक 15 रोजी रात्री 9 ते 10 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेतील मृत व्यक्तीचे नाव मोतीराम बाबुराव जाधव वय (40) रा. कंडारी तालुका परंडा जिल्हा धाराशिव असे आहे. याप्रकरणी आंबी पोलीस ठाण्यात मयताच्या पत्नीच्या फिर्यादीवरून खुनाचा पुन्हा नोंद करण्यात आला आहे . याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन परंडा न्यायालयात हजर केले असता त्यांना 6 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेमुळे कंडारी परिसरात तालुक्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे.
या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेले अधिक माहिती अशी की कंडारी येथील रहिवासी सोनाली मोतीराम जाधव यांचे पती मोतीराम बाबुराव जाधव वय (40) हे सोमवारी राहणार हे राञी 9 वाजेच्या सुमारास कुटुंबासह घरी जेवण करत होते. त्याचवेळी त्यांचे मित्र विष्णू कालिदास तिंबोळे आणि योगेश नागेश तिंबोळे दोघे राहणार कंडारी हे मोटरसायकल वरून त्यांच्या घरी आली त्यांनी मोतीराम यांना पप्पू रावखंडे यांच्या बंगल्यावर पार्टी होणार असून तिकडे जेवायला चल असे म्हणत ताटावरून उठवले यानंतर त्यांनी जाधव यांना मोटरसायकलवर बसवत सोबत घेऊन गेले. रात्री दहा वाजेच्या सुमारास मोतीराम यांना घेऊन गेलेल्या दोन मित्रापैकी विष्णू तिंबोळी हा एकटाच मोतीराम यांच्या घरी परतला त्यांनी कंडारी ते सोनेरी रोडवर पप्पू रावखंडे यांच्या बंगल्यासमोर अपघात झाला असल्याचे सांगितले.
या घटनेची माहिती कळताच मोतीराम जाधव यांची पत्नी सोनाली जाधव आणि आई रतन यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असता मोतीराम जाधव हे रस्त्यावर पडलेली होते. त्यांच्या डोक्याला मोठी दुखापत झाली होती ;चेहरा ठेचला गेलेला होता आणि रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रक्त सांडले होती विशेषता काही ठिकाणी सांडलेल्या रक्तावर पाणी आणि माती टाकलेली दिसून आली अपघातात तिघांपैकी केवळ मोतीराम यांनाच अपघात कसा झाला असा जाब पत्नीने विचारला असता ,आरोपी मित्राने उडवाउडवीची उत्तरे दिली.
या स्थितीमुळे अपघाताबाबतचा संशय बळावला त्या दोन मित्रांनीच मोतीराम याचा खून केल्याचा आरोप करून सोनाली जाधव यांनी याप्रकरणी आंबे पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली या फिर्यादीनुसार मोतीराम जाधव ,विष्णू तिंबोळे योगेश तिंबोळे यांच्या जुन्या भांडणावरून वाद होता सदरील भांडण तात्या रावखंडे व पप्पू रावखंडे यांनी सोडवण्याचा प्रयत्नही केला होता. तात्या रावखंडे हे जखमी झाले आहेत.जुन्या भांडणात रागातून विष्णू तिंबोळे व योगेश तिंबोळे यांनी मोतीराम जाधव यांच्या डोक्यात जड वस्तूने वार करून त्यांचा खून केला आणि अपघाताचा बनाव करण्याचा प्रयत्न केला असा गंभीर आरोप फिर्यादीने केला आहे हा अपघात नसून मागील भांडणाची खुन्नस ठेवून केलेला खून आहे का ?डोक्यात कोणत्या जड वस्तूने मारले ?तात्या रावखंडे यांना झालेल्या दुखापतीचा आणि खुणाचा काय संबंध आहे याचा सखोल तपास पोलीस करत आहेत याप्रकरणी आंबे पोलिसांनी दोन्ही सशंयीत आरोपींना अटक करून परंडा न्यायालयात हजर केली असता त्यांना 22 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
घटनास्थळाच्या पंचनामा करतेवेळी रक्ताचे डाग धुण्याचा आरोपीचा प्रयत्न उघड
पोलिस आणि फॉरेन्सिक टीमकडून करण्यात आलेल्या पंचनाम्यात हा अपघात नसून घातपातच असल्याचे स्पष्ट झाले आहे. कंडारी -सोनारी रस्त्यावर घटनास्थळी तात्या रावखंडे यांच्या घराशेजारील पत्र्याच्या शेडमध्ये रक्ताचे डाग दिसून आले. या ठिकाणापासून रस्त्यापर्यंत रक्ताचे डाग दिसले होते एवढेच नव्हे तर काही ठिकाणी रक्ताचे डाग पाण्याने धुऊन काढले आहेत काही ठिकाणी माती व वाळू टाकुन रक्ताचे निशाण लपविण्याचा प्रयत्न झाल्याचे पंचनाम्यात स्पष्ट झाले आहे. यावरून आरोपींनी खुणानंतर पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट होत असून पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेची माहिती मिळताच आंबी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरख खरड व पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. फिर्यादीतील गंभीर आरोप आणि घटनास्थळातील स्थिती रक्तातील माती टाकणे, अपघाताबाबतचा संशय लक्षात घेऊन पोलिसांनी तपासाची चक्री गतिमान केली .आंबी पोलिसांनी आरोपी विष्णू कालिदास तिंबोळी व योगेश नागेश तिंबोळी यांच्या विरोधात मयताची पत्नी फिर्यादी सोनाली जाधव यांनी दि.16 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पो ठाणे आंबी येथे भा.न्या.सं.कलम 103(1), 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
या घटनेनंतर काही तासातच दोन्ही संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे आनाळा आरोग्य केंद्रात मयत मोतीराम जाधव यांचे मंगळवारी शववाविच्छेदन करण्यात आले. यावेळी कुटुंबातील नागरिक व नातेवाईकांनी मोठा जमाव केला होता .नंतर घटनास्थळी शेकडो नातेवाईक व नागरिकांनी जमा होऊन संताप व्यक्त केला आरोपींना फाशी शिक्षा होण्यासाठी पोलिसांनी तपास निपक्ष व अचूक करावा अशी मागणी संतप्त नागरिकांतून केली जात आहे .

0 Comments