कौतुकास्पद : श्री तुळजाभवानी रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष बबनराव गावडे यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान-.
तुळजापूर प्रतिनिधी : आनंदी युनिव्हर्सल फाउंडेशन च्या वतीने सोलापूर तुळजापूर धाराशिव उस्मानाबाद हा रेल्वे मार्ग व्हावा म्हणून तुळजाभवानी रेल्वे संघर्ष समितीच्या वतीने 2006 मध्ये आंदोलन ठेवण्यात आले होते विविध आंदोलनाच्या माध्यमातून संघर्ष समितीला पंधरा ते वीस वर्ष या रेल्वेमार्गासाठी आंदोलनाच्या माध्यमातून संघर्ष करावा लागला. या आंदोलनाची दखल घेऊन आनंदी युनिव्हर्सल फाउंडेशन पुणे यांनी तुळजाभवानी रेल्वे संघर्ष समिती व अध्यक्ष बबनराव गावडे यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार सिने अभिनेते प्रसाद शिखरे व अभिनेत्री आयलीघीया यांच्या शुभहस्ते पंडित जवाहरलाल नेहरू सभागृह पुणे येथे दिनांक दि,१० डिसेंबर रोजी देण्यात आला .
यावेळी विकास तांबे रत्नाकर खोले अशोकराव साळुंखे राऊफ शेख अंबादासराव पोपळे अनिल हंगरगेकर मोहन भोसले सतीश पवार राहुल गवळी खयूम शेख अनमोल साळुंखे चंद्रकांत मस्के बापू वैरागे गोविंद दिवटे दयानंद पांचाळ कोंडीबा प्रताप लायक सय्यद व सर्व सदस् क्षेत्रात काम करणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील व्यक्तीं व उद्योजकांना ही महाराष्ट्र उद्योजक पुरस्कार व महाराष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला .

0 Comments