चारित्र्यावर संशय मानसिक त्रास विवाहतेची गळफास घेऊन आत्महत्या; पतीसह दोघा जणांवर गुन्हा दाखल-Dharashiv Kalanb Police Station Crime News

Hot Posts

6/recent/ticker-posts

चारित्र्यावर संशय मानसिक त्रास विवाहतेची गळफास घेऊन आत्महत्या; पतीसह दोघा जणांवर गुन्हा दाखल-Dharashiv Kalanb Police Station Crime News

चारित्र्यावर संशय मानसिक त्रास विवाहतेची गळफास घेऊन आत्महत्या; पतीसह दोघा जणांवर गुन्हा दाखल-


 धाराशिव  : चारित्र्यावर संशय घेऊन पतीसह  सासरच्या मंडळींनी शारीरिक व मानसिक त्रास दिल्यामुळे कम तालुक्यातील एका विवाह तिने गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवण्याची धक्कादायक घटना दिनांक 29 रोजी घडली आहे. श्रद्धा मारुती माने असे मयत विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी मयत विवाहितेच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून दि,९ रोजी  पतीसह सासू सासरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की ,मयत नामे-श्रध्दा मारुती माने, रा. देवधानोरा ता. कहंब ह.मु. पुनर्वसन सावरगाव कळंब ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि.29.11.2025 रोजी 08.30 वा. राष्ट्रमाता जिजाउ पतसंस्था कळंब येथील बाथरुम मध्ये गळफास घेवून आत्महत्या केली. आरोपी नामे-पति मारुती उत्रेश्वर माने, सासरे उत्रेश्वर माने, सासु भगीरथी उत्रेश्वर माने, सर्व रा. देवधानोरा ता. कळंब ह.मु पुनर्वसन सावरगाव कळंब ता. कळंब जि. धाराशिव यांनी  मयत श्रध्दा हिचे चारित्र्यावर संशय घेवून तिस  शारिरीक व मानसिक दिलेल्या त्रासाला कंटाळुन मयत श्रध्दा यांनी आत्महत्या केली आहे. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-बळीराम श्रीपती गोरे, वय 54 वर्षे, रा. धनेगाव ता. केज जि. बीड यांनी दि.09.12.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.न्या.सं.कलम-108, 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास कळम पोलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments