भीषण घटना : ट्रक व कारच्या भीषण अपघात; दोन तरुणाचा जागीच मृत्यू - लातूर जिल्ह्यातील घटना-Ratnagari-Nagpur Road Accident Latur Ahamadpur

Hot Posts

6/recent/ticker-posts

भीषण घटना : ट्रक व कारच्या भीषण अपघात; दोन तरुणाचा जागीच मृत्यू - लातूर जिल्ह्यातील घटना-Ratnagari-Nagpur Road Accident Latur Ahamadpur

भीषण घटना : ट्रक व कारच्या भीषण अपघात; दोन तरुणाचा जागीच मृत्यू - लातूर जिल्ह्यातील घटना- 


लातूर/प्रतिनिधी रूपेश डोलारे  : रत्नागिरी -नागपूर महामार्गावर अहमदपूर बायपास जवळ गुरुवारी दिनांक ४ रोजी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास ट्रक व क्रेटा कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात कारमधील  दोन तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे .या अपघातात भरधाव वेगातील क्रेटा कार मागच्या बाजूने ट्रकच्या(Truck Accident)  खाली घुसल्याने दोन तरुणाचा जागीच मृत्यू झाला. अपघातात मृत्यू पावलेल्या तरुणाची नावे रवी कुमार तुकाराम दराडे वय (20) (रा. कराड नगर अहमदपूर) तसेच सागर दिलीप ससाने वय (20) (रा. फत्तेपुर तालुका अहमदपूर) अशी आहेत.

या घटनेबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की रवी कुमार तुकाराम दराडे व सागर दिलीप ससाने हे दोघेही अहमदपुर तालुका तील (Ahamadpur )शिरूर ताजबंद येथे जेवण करून त्यांच्या कारने (MH- 24 ए टी 97 77) अहमदपूर कडे निघाले होते. गुरुवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास त्यांच्या कारने समोरच्या ट्रकला जोराची धडक(Car dash Truck) दिली. धडक एवढी भीषण होती की कार थेट मागच्या बाजूने ट्रकमध्ये (Mh 32 डी ०९६६) मध्ये घुसली कारचा चुरडा झाला आहे. ट्रकचे हे मोठे नुकसान झाले आहे ट्रकचे मागचे टायर तुटून पडले आहेत अपघातानंतर घटनास्थळी जाऊन पोलिसांनी कारचा वेग भरधाव असण्याची शक्यता  वर्तवली. कार ट्रक खाली दबल्याने क्रेनच्या साह्याने कार बाहेर काढून मृतदेह बाहेर काढण्यात आली दोन्ही मताची मृत्यू अहमदपूर येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात(Rural civil Hospital) शवाविच्छेदनासाठी (Postmatarm)पाठवण्यात आले. शविच्छेदनानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच अहमदपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोले व पोलीस निरीक्षक विनोद मेञेवार यांनी तातडीने सहकार्यांसह अपघात स्थळी धाव घेतली .त्यांनी मदत कार्य करून वाहतूक सुरळीत केली या प्रकरणी ट्रकचालक म्हणून चून्नूमियाॅं पाशा यांच्या फिर्यादीवरून अहमदपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

0 Comments