लग्नकार्यानंतर नवरीला सासरी घेऊन जाताना नवरी अर्ध्या रस्त्यातून दागिने पैसे घेऊन पसार; बोगस लग्न लावून पुण्याच्या कुटुंबाला लावला चुना सव्वातीन लाखाचा गंडा-
परभणी : पुण्यातील एका कुटुंबाला लग्नाचे आमीष दाखवून लाखो रुपयाची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे .विवाह जमवून देणाऱ्या एका टोळीने संगणमत करून बनावट लग्न लावले आणि नवरी मुलीच्या माध्यमातून वराच्या कुटुंबाला 3 लाख 25 हजार रुपयांना गंडा घातला नवरी मुलगी अंबाजोगाई येथे चहासाठी गाडी थांबल्यानंतर दागिने घेऊन पसार झाल्याची धक्कादायक घटना दि,३ रोजी नुकतीच घडली आहे.
या घटनेबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की अशी की पुण्यातील पर्वती दर्शन येथील रहिवासी असलेली किरण रोहिदास मोरे व त्यांचे कुटुंबीय अंजना मोरे, बहीण पूजा मोरे, आणि रतन भिकू बोबडे मुलाच्या लग्नासाठी मुलगी पाहत होते. याच संधीचा फायदा घेत विनायक जाधव ,रेखा सूर्यवंशी ,रंजना मोरे ,नवनाथ बंडगिरे ,प्रवीण कानेगावकर तसेच परभणी जिल्ह्यातील पालम शहरातील विनायक काकडे व माने नामक महिला एजंट यांनी या कुटुंबाशी संपर्क साधला या टोळीने मोरे कुटुंबाला पालम शहरातून बोलावून घेतले आणि पूर्वनियोजित गटाप्रमाणे बनावट कागदपत्रे सरला मधुकर कोलते (रा. धनगर टाकळी तालुका परभणी) या नावाचे बोगस आधार कार्ड असलेली एक मुलगी दाखवली आणि ताबडतोब लग्नकार्य उरकून टाकले .नवरा मुलगा किरण मोरे हा नवविवाहित नवरीला सोबत घेऊन पुणे येथे जात असताना फसवणूक करणाऱ्या टोळीतील सदस्य दुसऱ्या गाडीने अंबाजोगाईपर्यंत त्यांचा पाठलाग करीत होते. याची नवऱ्या मुलाच्या कुटुंबाला कसलीही कल्पना नव्हती अंबाजोगाई येथे चहासाठी गाडी थांबवताच नवरी मुलगी सर्व दागिने घेऊन पसार झाली.
यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मोरे कुटुंबियांनी तात्काळ पालम पोलीस ठाणे गाठले आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक एस .के खटाणे यांना घडलेला प्रकार सांगितला घडलेल्या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक खटाणे यांनी तपास चक्र वेगाने फिरवत पालम शहरातील मीना काकडे यांनी माने नामक दोन एजंट महिलांना ताब्यात घेतली असून त्यांची कसून चौकशी चालू आहे रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
बोगस विवाह लावून कुटुंबीयांची फसवणूक
रोक रक्कम 2 लाख 90 हजार रुपये तर 35 हजार रुपये किमतीचे मनी मंगळसूत्र आणि जोडवे अशी एकूण 3 लाख 25 हजार रुपयांचा ऐवज घेऊन टोळीने बुधवार दिनांक 3 रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास केरवाडी शिवारातील हनुमान मंदिरात लग्न लावून दिले लग्न झाल्यानंतर नवरी मुलीला पुणे येथे पाठवण्यासाठी गाडीत बसून मोरे कुटुंब यांना रवाना करण्यात आले.

0 Comments