तुळजापूर : तक्रार मागे घेण्यासाठी तहसीलदाराला मागितली १५ लाखांची खंडणी; मंडळ अधिकाऱ्यासह एकावर गुन्हा दाखल महसूल प्रशासनात खळबळ-Tuljapur Police Station Crime News

Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापूर : तक्रार मागे घेण्यासाठी तहसीलदाराला मागितली १५ लाखांची खंडणी; मंडळ अधिकाऱ्यासह एकावर गुन्हा दाखल महसूल प्रशासनात खळबळ-Tuljapur Police Station Crime News

तुळजापूर  : तक्रार मागे घेण्यासाठी तहसीलदाराला मागितली १५ लाखांची   खंडणी; मंडळ अधिकाऱ्यासह एकावर  गुन्हा दाखल महसूल प्रशासनात खळबळ-



धाराशिव: तुळजापूर तहसीलदारदारालाच मंडळ अधिकाऱ्यांनी खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तुळजापूरचे तहसीलदार अरविंद बोळंगे ब्लॅकमेल करून पैशांची मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तुळजापूरचे तहसीलदार अरविंद बोळंगे यांच्याकडे तक्रार मागे घेण्यासाठी 15 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याप्रकरणी त्यांचेच सहकारी मंडळ अधिकारी दिनेश बहिरमल आणि वकील बालाजी बोडके यांच्याविरुद्ध तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे प्रकरण एवढ्यावरच न थांबता दाखल तक्रार मागे घेण्यासाठी एका वकिलामार्फत तहसीलदारांना 15 लाखाची खंडणी मागून ब्लॅकमेल करणाऱ्या मंडळ अधिकाऱ्यांसह एकावर  तुळजापूर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे महसूल प्रशासन व न्यायायीन क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे.

या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार तुळजापूर येथील तहसीलदार(Tahsildar)  अरविंद बोळंगे यांच्या अंतर्गत तालुक्यातील आरळी बुद्रुक येथे मंडळ अधिकारी म्हणून दिनेश बहिरमल हे प्रतिनियुक्ती वर काम पाहत होते. बहिरमल यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या क्रेडिट कार्ड (Credit Card)वरून तब्बल 4 लाख रुपयाचे कर्ज घेतले होते.सदरचे कर्ज थकीत गेल्याने बँकेच्या वसुली अधिकाऱ्याकडून वसुलीसाठी बहिरमल यांच्या मागे तगादा लावण्यात आला बँकेकडून येणाऱ्या सततच्या फोनचा ससेमिरा चुकण्यासाठी बहिरमल यांनी थेट कार्यालय प्रमुख म्हणून तहसीलदार अरविंद पोळंके यांच्या मोबाईल नंबर दिला . निवडणुका जाहीर झाले की कडे निवडणूक कामाचा व्याप असताना बँकेकडून सत्य त्यांनी तहसीलदार बोळंगे यांना बहिरमल यांच्या थकीत कर्जाच्या वसुलीच्या अनुषंगाने फोन येऊ लागले.

यामुळे संतप्त तहसीलदारांनी मंडळ अधिकारी बहिर्मड यास या प्रकरणी ज्या विचारात कान उघडणे केली होती यावरूनच बहिर्मल यांनी थेट आनंदनगर पोलीस ठाणे गाठून तहसीलदार अरविंद बोंळगे यांच्याकडून आपणास शिवीगाळ  झाल्याची तक्रार देण्यात आली .त्यानुसार तहसीलदार यांच्यावर गुन्हा दाखल झाला एकीकडे हा गुन्हा दाखल झाल्यानंतर मंडळ अधिकारी भैरमल यांनी वकील बालाजी बोडके यांच्यामार्फत तहसीलदार बोळंगे यांच्याशी व्हाट्सअप कॉल(Watsup calk) द्वारे संपर्क साधा तक्रार मागे घेण्यासाठी 15 लाख रुपये व माफीनामा मागण्यात आला. तडजोडी अंतिम 10 लाख रुपये द्यावे तशी मागणी केली शेवटी ही तडजोडीची रक्कम 2 लाख रुपयावर आली तसेच माफीनामा नसला तरी चालेल असे सांगण्यात आले. त्यानंतर मंडळ अधिकारी बहिरमल  व adv. बालाजी बोडके हे 6 डिसेंबर रोजी दुपारी तहसीलदार बोंळगे यांच्या घरी गेले यावेळी त्यांनी एका व्यक्तीचा बँक खाते क्रमांक तहसीलदाराच्या व्हाट्सअप वर पाठवत पैसे दिले तर प्रकरण मिटेल नाही तर त्रास वाढेल असा धमकी वजा इशारा दिला.

 या दबावास कंटाळून तहसीलदार अरविंद बोंळगे यांनी तुळजापूर पोलीस ठाण्यात मंडळ अधिकारी दिनेश बहिरमल व साथीदार adv. बालाजी बोडके या दोघाविरोधात खंडणी मागीतल्या प्रकरणी तक्रार दिली त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments